

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूरवरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स (MH २९ BE १८१९) ची खासगी बस भीषण अपघातात जळून खाक झाली. या बसमधील २५ प्रवासांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रवाशांमध्ये ७ जण नागपुरातील असून यातील ६ जणांची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. सर्व फोन स्विच ऑफ असल्याने माहिती मिळणे कठीण झाले Buldhana Bus Accident आहे.
कैलास गंगावणे बारामती येथील असल्याचे समजते. नागपूरमधील प्रवाशी आयुष गाडगे, कौस्तूभ काळे, कैलास गंगावणे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई अशी मृतांची नावे आहेत. (Buldhana Bus Accident)
समृद्धी महामार्गावरील मौजा पिंपळखुटा, (सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथे रात्री २ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (0712-2562668) अंकुश गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8860018817) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा