

प्रसाद जगताप
पुणे : सध्या शहरातील रस्त्यावर 44 लाख वाहने धावत आहे. मात्र, गेल्या वर्षी 2022 मध्ये केवळ 9 लाख 65 हजार 623 वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र काढण्यात आले आहे. उर्वरित 35 लाख वाहनचालकांनी पीयूसी प्रमाणपत्र काढलेले नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकेकाळी 'राहण्यायोग्य शहर' म्हणून पुणे शहराची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रदुषणामुळे ही ओळख मिटायला सुरुवात झाली आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या टॉमटॉम संस्थेच्या अहवालात वाहतूक कोंडीत पुणे शहराचा सहावा क्रमांक असल्याचे म्हटले आहे. वाहनांचे विस्फोट रोखणे, प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा आगामी काळात प्रदुषणात भर पडण्याची भीती हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातआहे.
वाहनचालकांचे दुर्लक्ष
तुमच्या वाहनामुळे प्रदुषणात भर पडते की नाही,, यासंबंधीचा अहवाल पीयूसी प्रमाणपत्रामुळे मिळतो. शासनाने प्रदूषण नियंत्रणाकरिता सर्व वाहनांना पीयूसी सर्टिफिकीट (पोल्युशन अंडर कंट्रोल) बंधनकारक केली. मात्र, वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी, प्रदुषणात भर पडत आहे.
पीयूसीचे काय आहेत दर?
चारचाकी पेट्रोल – 125 रु.
चारचाकी डिझेल – 150 रु.
दुचाकी – 50 रु.
पीयूसी केंद्र संख्या – 288
पीयूसी प्रमाणपत्र संख्या
(जानेवारी ते डिसेंबर 2022)
जानेवारी – 93,396
फेब्रुवारी – 86,591
मार्च – 89,843
एप्रिल – 68,931
मे – 73,121
जून – 72,534
जुलै – 66,110
ऑगस्ट – 77,356
सप्टेंबर – 77,020
ऑक्टोबर – 83,772
नोव्हेंबर – 82,895
डिसेंबर – 94,054
एकूण प्रमाणपत्र :
9 लाख 65 हजार 623
प्राप्त महसूल :
27 हजार रुपये
कोणती-किती वाहने धावतात
वाहन प्रकार – संख्या
मोटारसायकल – 32,74,672
मोटारकार – 7,72,125
टॅक्सी कॅब – 37,960
अॅटोरिक्षा – 91,454
स्टेज कॅरेज -3,654
कॉन्ट्रॅक्ट कॅरेज – 12,737
स्कूल बसेस – 3,408
पीव्हीट सर्विस व्हेईकल – 1,479
अॅम्बुलन्स – 1,625
आर्टी.अॅण्ड मल्टी. व्हेईकल – 13,035
ट्रक्स अँड लॉरी – 97,297
टँकर – 5,666
डिली. व्हॅन (चारचाकी) – 68,486
डिली. व्हॅन (तीनचाकी) – 40,815
ट्रॅक्टर – 33,122
ट्रेलर – 13,122
अन्य वाहने – 9,016
एकूण वाहने – 44,19,669
पीयूसी न काढणार्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकींचीच संख्या आहे. दुचाकीस्वार इन्शुरन्सच काढत नाहीत, पीयूसी कधी काढणार? शासनाने इन्शुरन्स, पीयूसी प्रत्येक वाहनाला बंधनकारक केले आहे. चारचाकी गाड्या इन्शुरन्स आणि पीयूसी असल्याशिवाय पासिंग केले जात नाही.
– बाप्पू भावे, खजिनदार, पुणे शहर रिक्षा फेडरेशनशासनाने पीयूसी काढणे, हे वाहनचालकांना बंधनकारक केले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे वाहनचालकांनी आपल्या वाहनाची पीयूसी काढायलाच हवी. आरटीओने प्रमाणित केलेली शहरात अनेक पीयूसी सेंटर आहेत. त्याठिकाणी जाऊन पीयूसी काढावी, यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा हातभार लागणार आहे.
– चैतन्य पोरे, पीयूसी केंद्रचालक, श्री अॅटो रिक्षा संस्था