.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ठाणे, पुढारी वृत्तसेवा : गणरायाच्या एकाच भव्य मूर्तीमध्ये तब्बल २५१ गणरायांची रूपे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाप्पाची ही १९ फुटांची भव्य दिव्या अनोखी मूर्ती पाहायला मिळणार आहे भांडुपच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये. २०१० साली अशाप्रकारे बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली होती. त्यावेळी ही मूर्ती बघण्यासाठी गणेशभक्तांनी एकाच गर्दी केली होती. आता याच पद्धतीने ही मूर्ती सरकण्यात आली असल्याने गणेश भक्तांना पुन्हा एकदा बाप्पाच्या या अनोख्या मूर्तीचे दर्शन करण्याची ओढ लागली आहे. (Ganesh Chaturthi 2024)
भांडुप येथील भांडुपच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा, टेंबीपाडा हे मंडळ स्थापनेपासूनच नवं नवीन देखावे व नाविन्यपूर्ण बाप्पाच्या मुर्त्यांसाठी ओळखले जाते. यंदाचे मंडळाचे हे ६४ वे उत्सव वर्ष असून ह्याही वर्षी मंडळाने अशीच अद्भुत व नाविन्यपूर्ण अशी २५१ बाप्पापासून बनवलेले तब्बल १९ फुटांची ही अद्भुत मूर्तीची स्थापना आपल्या उत्सव मंडपात प्रतिष्ठापीत केली आहे.
१४ वर्षांपूर्वी या मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्यावेळीही नाविन्यपूर्ण मुर्त्या बसवण्याचा वारसा जपत मंडळाने २५१ बाप्पाची स्थापना केली आणि ही अद्भुत व स्तुतीजनक मूर्ती मूर्तिकार प्रशांत मयेकर ह्यांनी साकारली होती. आणि त्यांचा वारसा जपत यावर्षी पुन्हा १४ वर्षानंतर मूर्तिकार विष्णू राणे ह्यांनी ही मूर्ती साकारली आहे. असं म्हंटले जाते की मूर्तीमधील सर्व जिवंतपणा त्या मूर्तीच्या डोळ्यात दिसतो. मूर्तीचे डोळे साकारले आहेत भांडुपच्या संतोष रंगजी यांनी. जुनी पोलिस चौकी, टेंभीपाडा, भांडूप (प) या ठिकाणी बाप्पाची मूर्ती बाप्पाची मूर्ती स्थापित करण्यात आली असून बाप्पाचे दर्शन घेण्याची ओढ आता सर्वच गणेश भक्तांना लागली आहे