Aamir Khan : २५ वर्षांनंतर आमिर खानची ‘सरफरोश २’ ची घोषणा?

Aamir Khan : २५ वर्षांनंतर आमिर खानची ‘सरफरोश २’ ची घोषणा?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारपैकी एक आहे. चार दशकांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये आमिरने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. यातील एक म्हणजे, 'सरफरोश' हा चित्रपट आहे. या चित्रपटाला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास सोहळ्याच्या निमित्ताने आमिरने त्याच्या आगामी 'सरफरोश २' चित्रपटाची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे 

  • आमिर खानच्या 'सरफरोश' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण
  • मुंबईत चित्रपटाचे स्क्रिनिंग
  • आगामी 'सरफरोश २' चित्रपटाची घोषणा

'सरफरोश' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण

अभिनेता आमिर खानच्या 'सरफरोश' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने यानिमित्त मुंबईत चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्टसोबत आमिर खान, मुकेश ऋषी, सोनाली बेंद्रे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक जॉन मँथ्यू मँथ्थान उपस्थित होते. या चित्रपटात आमिरने एसीपी अजय राठोडची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता नसीरुद्दीन शाहने गझल गायक गुलफाम हसन या खलनायकची भूमिका साकारली आहे. या स्क्रिनिंगनंतर चित्रपटाचे कलाकार आमिर खान आणि दिग्दर्शक जॉन मँथ्यू मँथ्थान हे मीडियाशी संवाद साधला. याचदरम्यान आमिरने आगामी 'सरफरोश २' चित्रपटाची घोषणा केली.

'सरफरोश २' येणार?

यावेळी आमिर खान म्हणाला की, "माझा विश्वास आहे की, लवकरच 'सरफरोश २' बनवला जाईल. आम्ही योग्य कथेवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि त्याचा शोध लवकरच पूर्ण होईल. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर सरफरोश दिग्दर्शकांना पुन्हा तयार राहावे लागेल." यावरून आमिरचा पुन्हा आगामी 'सरफरोश २' योणार असल्याची माहिती समोर आली आहे. या गुडन्यूजमुळे चाहत्याचा आनंद गगनात मावेना झाला. मात्र, याबाबतची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खानने अभिनय जगतापासून ब्रेक घेतला आहे. यानंतर आमिरने 'सितारे जमीन पर' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला. आता 'सरफरोश' या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news