

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात आज दुपारी झालेल्या २ बाँबस्फोटात २४ लोकांचा बळी गेला आहे. पहिल्या बाँबस्फोटात १४ तर दुसऱ्या बाँबस्फोटात १० लोकांचा बळी गेला आहे. पाकिस्तानात गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बाँबस्फोटांनी खळबळ माजली आहे. स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही स्फोटांतील मिळून मृतांची संख्या २४ असल्याचे सांगण्यात आले आहे. Pakistan Bomb Blast
यातील पहिला स्फोट पिशिन जिल्ह्यातील एका अपक्ष उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर झाला. तर दुसरा स्फोट अफगाणिस्तान सीमेवरील किला सैफुल्ला या भागात झाला. हा भाग अफगाणिस्तान सीमेच्या जवळ आहे. हा स्फोट जमियत उलेमा इस्लाम या पक्षाच्या कार्यालयाबाहेर झाला आहे. हा पक्ष धार्मिक असून, या पक्षाला यापूर्वीही दहशतवाद्यांनी लक्ष केले आहे. Pakistan Bomb Blast
या बाँबस्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण या स्फोटांमागे पाकिस्तानी तालिबानच्या हात असल्याचे बोलले जाते. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी कारवायांत वाढ झालेली आहे. या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैनिक आणि पोलिसही तैनात आहेत, असे असतानाही हे स्फोट झाले आहेत.
हेही वाचा