

दोनवडे : पुढारी वृत्तसेवा : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवर गुरूवारी भर दिवसा दरोडा टाकून चार दरोडेखोरांनी दोन कोटीचे दागिन्यांची लूट केली होती. तसेच मालक रमेश माळी आणि जीतू माळी यांना मारहाण व गोळीबार करून गगनबावड्याच्या दिशेने मोटारसायकलवरून धूम ठोकली होती. आज दरोडयात वापरलेल्या दोन मोटारसायकली खुपीरेच्या पश्चिमेला असलेल्या स्पिनिंग मिलच्या शेतवडीत आढळून आल्या आहेत.
बालिंगे येथे रमेश माळी यांचे सराफी दुकान आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर गजबजलेल्या ठिकाणी असणाऱ्या कात्यायनी ज्वेलर्स या दुकानात नेहमी वर्दळ असते. पण भरदिवसा टाकलेल्या दरोड्यामुळे व्यापाऱ्यांसह दुकानदार व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा