

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज ( दि.२२) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद झाल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच शोध मोहिम राबविण्यात आली. लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलांवर दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत दाेन जवान शहीद झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रम्यान, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 4 मॅगझिन, 2 फिलर मॅगझिन आणि 8 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही दहशतवाद्यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. मुमताज अहमद लोन आणि जहांगीर अहमद लोन हे कुपवाडा येथील त्रेहगाम येथील रहिवासी आहेत. येथे दोन दहशतवादी लपल्याची बातमी आहे. अजूनही चकमक सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले.