‘इथे’ पार्किंगसाठी वर्षाला द्यावे लागतात 2.45 कोटी!

‘इथे’ पार्किंगसाठी वर्षाला द्यावे लागतात 2.45 कोटी!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : सध्याच्या काळात पार्किंगची सोय असणे ही एक गरजेची बाब बनलेली आहे. त्यामुळे कोणत्याही सोसायटीत फ्लॅट किंवा व्हिला खरेदी करण्यासोबतच पार्किंगसाठी जागाही खरेदी करावी लागते. यासाठी तुम्हाला 1 ते 5 लाख रुपये द्यावे लागतात; पण तुम्हाला कधी पार्किंग स्पॉट मिळवण्यासाठी एका वर्षासाठी 2.45 कोटी रुपये मोजावे लागतील, असे सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण हे सत्य आहे. एवढे पैसे तुमच्याकडे असतील तर तुम्ही दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी लक्झरी फ्लॅट खरेदी करू शकता; पण एवढे पैशात तुम्ही न्यूयॉर्कमधील एका सोसायटीमध्ये केवळ कार पार्किंगच घेऊ शकता, तेही कायमस्वरूपी नव्हे तर केवळ एकाच वर्षासाठी!

ही एक रोबोटिक पार्किंग स्पेस आहे. हे अंडरग्राऊंड पार्किंग असून आणि लिफ्टच्या मदतीने तुमचे वाहन स्वयंचलितपणे पार्किंगच्या ठिकाणी पोहोचते. यामध्ये वाहनचालकाला पार्किंगच्या ठिकाणी जावे लागत नाही. टोल ब्रदर्सनी बांधलेल्या लक्झरी 140 कॉन्डो युनिटस्च्या खाली असलेल्या या पार्किंगच्या जागेची किंमत वर्षाला 300,000 डॉलर आहे. त्याचवेळी या कॉन्डोची किंमत सुमारे 9.45 दशलक्ष डॉलर आहे. हे पार्किंग स्पॉट खरेदी केल्यानंतर, तुम्हाला 'आरएफआयडी' टॅग मिळेल. टर्मिनलच्या बाहेर हा टॅग केल्यानंतर, पार्किंग स्पॉटचा दरवाजा उघडतो.

तुम्हाला तुमची कार दाराच्या आत निश्चित केलेल्या ठिकाणी पार्क करावी लागेल. कारमधून बाहेर पडल्यानंतर, तुम्हाला तेथे असलेले हिरवे बटण दाबावे लागेल. हिरवे बटण दाबल्यानंतर कार लिफ्टच्या मदतीने आपोआप अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये जाते. येथील इंटेलिजेंट पार्किंग सिस्टीम तुमची कार निर्धारित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी पार्क करते. या इंटेलिजेंट पार्किंग सिस्टीम स्पॉटमधून तुमचे वाहन बाहेर काढण्यासाठी देखील खूप कमी वेळ लागतो.

या पार्किंगच्या ठिकाणापासून वाहन चालकापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 2.15 मिनिटे लागतात. विशेष म्हणजे तुमची कार अशाप्रकारे पार्क केलेली असते की ती बाहेर ड्रायव्हरपर्यंत पोहोचते तेव्हा समोरचा भाग बाहेर पडण्याच्या दिशेने असतो. याचा अर्थ वाहन पार्किंगमधून बाहेर काढण्यासाठी कार बॅक करण्याची गरज नाही. सामान्य कारसाठी या पार्किंगची किंमत 3 लाख डॉलर्स आहे, तर इलेक्ट्रिक कारसाठी, या पार्किंगसाठी 50 हजार डॉलर्स अधिक मोजावे लागतील. एका वर्षासाठी ईव्ही पार्किंगसाठी 3.5 लाख डॉलर्स द्यावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news