file photo
file photo

नागपूर : रात्रीस खेळ चाले! अश्लील नृत्य, ६ तरुणींसह १२ जण जाळ्यात

Published on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत कऱ्हाडला अभयारण्याजवळ असलेल्या तिरखुरा येथील द टायगर पॅराडाईज अँड वॉटर पार्कमध्ये डीजेच्या तालावर नाचणारे १२ जणांना ताब्यात घेणारे आहेत. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत चालणाऱ्या अश्लील नृत्यावर, पैसे उधळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धाड घालून सहा तोकड्या कपड्यातील तरुणींसह डॉक्टर, व्यापारी अशा एकूण १८ जणांना अटक केली आहे. नंतर जमिनीवर त्यांची सुटका झाली. ललित नंदलाल बैस, अभय रमेश भागवत, डॉ. गोपाल सत्यनारायण व्यास (रा. भंडारा), पंकज तुळशीराम हातीठेले (रा. जरीपटका, नागपूर), मनीष ओमप्रकाश सराफ (रा. वर्धा), समीर कमलाकर देशपांडे, रजत विनोद कोलते, कोदामेंढी, मंगेश सुरेश हरडे नंदनवन नागपूर, आशुतोष शेषराव सुखदेवे, केशव रवींद्र तरडे, पारस ज्ञानेश्वर हातीठेले आणि या रिसॉर्टचा व्यवस्थापक अरुण अभय मुखर्जी (रा. मनीष नगर नागपूर) यांच्यासह ६ तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र पडोळे यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट आहे. या ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. न्यूड डान्स सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल मस्के, ओमप्रकाश कोकाटे, आशिष मोरखेडे मिलिंद नांदूरकर,अरविंद भगत आदी सहकाऱ्यांनी मध्यरात्री ही कारवाई केली.
घेरून केलेल्या कारवाईत सहा तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना आढळल्या. त्यांच्यावर पैशांची उधळण देखील केली जात होती. पोलिसांनी रिसॉर्ट मधून दारूचा साठा, लॅपटॉप, एक लाख तीस हजारांची रोख रक्कम असे सुमारे चार लाख रुपयांचे साहित्यही जप्त केले. गेले अनेक दिवस या ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली.

या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामीण हद्दीत शौकिनांसाठी खास आयोजन करण्यात येण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी देखील उमरेड, भिवापूर, कुही या भागात आक्षेपार्ह नृत्य प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news