Gujarat Election Results : गुजरातमधील अभूतपूर्व विजयामुळे राज्यसभेत पोहोचणार भाजपचे ११ खासदार

Gujarat Election Results : गुजरातमधील अभूतपूर्व विजयामुळे राज्यसभेत पोहोचणार भाजपचे ११ खासदार
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election Results) भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. गुजरातच्या या अभूतपूर्व विजयाचा फायदा भाजपला राज्यसभेत होणार आहे. 2026 पर्यंत गुजरातमधील सर्व 11 राज्यसभा सदस्य पक्षाचे असतील. गुजरातमधून काँग्रेसचा एकही सदस्य राज्यसभेत पोहोचू शकणार नाही. राज्यसभेत सध्या भाजपचे 8 तर काँग्रेसचे 3 सदस्य आहेत. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये वरिष्ठ सभागृहात रिक्त होणाऱ्या ३ जागांवर भाजपचे सदस्य निवडून जातील.

(Gujarat Election Results) एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप चार पैकी दोन अतिरिक्त जागा जिंकेल. आणि जून 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत इतर चार पैकी आणखी एक जागा जिंकेल आणि राज्यात त्यांची एकूण संख्या 11 होईल. इतक्या संख्येने राज्यसभेवर खासदार निवडून जाण्याचा योग मोठ्या राज्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे. विशेषत: जेव्हा एका राज्यातून एकापेक्षा जास्त जागांसाठी निवडणुका होत असतात.

Gujarat Election Results : हिमाचलमध्ये काँग्रेसला दोन जागा मिळतील

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यांना मिळालेल्या जागांच्या संख्येनुसार, एप्रिल 2024 मध्ये राज्यसभेच्या तीनपैकी एक जागा आणि दोन वर्षांनंतर दुसरी जागा मिळेल. सध्या राज्यसभेतील हिमाचल प्रदेशातील तीनही सदस्य भाजपचे आहेत. त्यात पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचाही समावेश आहे. ते एप्रिल 2024 मध्ये निवृत्त होणार आहेत. राज्यातील तिसऱ्या जागेचे भवितव्य पुढील विधानसभेतच ठरवले जाईल. कारण 2028 मध्ये तेथे एक जागा रिक्त राहणार आहे.

एप्रिल 2024 मध्ये सभागृहाची रचना बदलेल

राज्यसभेची रचना पुढील वर्षी बदलणार नाही, जेव्हा सदस्यांच्या निवृत्तीमुळे केवळ 10 जागा रिक्त होतील. पण एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आसपास यात मोठा बदल होणार आहे. त्यानंतर राज्यसभेच्या 56 जागांसाठी मतदान होणार आहे. सध्या राज्यसभेत 239 सदस्य आहेत. कारण 245 जागांच्या सभागृहात सहा जागा रिक्त आहेत. यापैकी चार आणि दोन जम्मू-काश्मीरमधून नामांकित आहेत. 92 खासदारांसह भाजप हा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष आहे. यानंतर काँग्रेसकडे 31, टीएमसीचे 13, द्रमुक आणि आपचे प्रत्येकी 10 खासदार आहेत. सध्या, हिमाचल, दिल्ली, पंजाब, तेलंगणा आणि उत्तराखंड ही पाच राज्ये आहेत. जिथे राज्यसभेच्या सर्व जागा एकाच पक्षाकडे आहेत.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news