

मुंबई : एस.टी. महामंडळाने दिवाळीसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या जादा वाहतुकीसाठी प्रवाशाना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
महामंडळाने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार या दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 8 ते 27 नोव्हेंबरदरम्यान लागू राहणार आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांना तिकिटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवासावेळी वाहकाकडे भरावी लागणार आहे.