सोलापूर शहरातील सोरेगाव डान्सबारवर छापा | पुढारी

सोलापूर शहरातील सोरेगाव डान्सबारवर छापा

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सोरेगाव येथील भरवस्तीत सुरू असलेल्या डान्सबार वर सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रीती टिपरे यांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. बंदी असतानाही खुलेआम छमछम आणि पैशाची उधळण सुरू असल्याचा प्रकार त्यांनी चव्हाट्यावर आणला. यावेळी डान्सबार मालक सुनीर सुरगीहळ्ळी याच्यासह 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यावेळी पोलिसांनी 12 बारबालांना ताब्यात घेतले.

कारवाईत पोलिसांनी 2 नोटा मोजण्याचे मशिन, 1 लाख 11 हजारांची रोकड, 4 साऊंड बेस, 4 चारचाकी व 15 दुचाकी गाड्या असा 49 लाख 58 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्‍त केला.

डान्सबारचा मालक सुनील सुरगीहळ्ळी, मंतूनाथ जाधव, राहुल राठोड, मंजुनाथ भिमदे, प्रशांत गायकवाड, अजिंक्य देशमुख, शाम पवार, सिद्धाराम व्हनमाने, यमन्‍नगौडा बिरादार, अनिल कोठाणी, सचिन पवार, चंद्रशेचखर गंगदे, मोहित बाळगे, सचिन जगळघंटे, संतोष बाके, सुभाष कुरले, करण चव्हाण, शिवगोंडा सायगामे, प्रवीण राठोड, संतोष रजपूत, विनोद बडगेरी, रवि पवार, संगमेश्‍वर कांबळे, शंकर दुपारगुडे, दशरथ शिंदे, परशुराम कांबळे, प्रकाश वाघमारे, राजकुमार वाघमारे, नागेश निरगुडे, सौरभ दणाणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

बंदी असतानाही सोरेगांव येथे खुलेआम डान्सबारमध्ये बारबालांचा छम्छम सुरू होता. यातून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पण नियम धाब्यावर बसवून खुलेआम हा गोरखधंदा सुरूच होता.

याची महिती सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी अचानक कारवाईसाठी मोर्चा वळविला. स्वत: डॉ. टिपरे यांनी केवळ तीन कॉन्स्टेबलसमवेत जावून अचानक डान्सबारवर छापा टाकला.

तेथे खुलेआम मोठ्या प्रमाणात छमछमाट सुरू सुरू असल्याचे दिसून आले. यावेळी डान्सबारमध्ये तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर दोन्ही ठिकाणी, काही बारबाला या अर्धनग्न कपडे घालून व ग्राहकांकडे पाहून अश्‍लिल हातवारे नृत्य करताना आढळल्या. गर्दी पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांची कुमक मागवून घेतली. तत्काळ पोलिस फौजफाटा धावला. त्यांनी डान्सबारच्या मालकासह 30 जणांना ताब्यात घेतले. तेथील 12 बारबालांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी 1 लाख 11 हजाराची रोकड, 2 नोटा मोजण्याचे मशीन, 4 साऊंड बेस, 4 चारचाकी व 15 दुचाकी असा 49 लाख 58 हजार 100 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

परराज्यांतील बारबाला; कारवाई अनेकदा; पण बेदखलच!

डान्सबारमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बारबाला या गडचिरोली, मुंबईबरोबरच गुजरात, राजस्थान, कर्नाटकसह विविध राज्यांतील आहेत. या डान्सबारवर यापूर्वी अनेकवेळा कारवाई करण्यात आली होती. तरीही खुलेआम हा डान्सबार सुरूच आहे. आज पोलिसांनी कारवाई करताच काही बारबाला व ग्राहकांनी पोलिसांना धक्‍काबुक्‍की करून तेथून पोबारा केला.

पळून गेलेल्यांचा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे शोध घेणार : टिपरे

डान्सबारवर पोलिसांचा छापा पडल्यावर काही बारबाला व ग्राहक पळून गेले आहेत. त्यांच्या गाड्या जप्‍त करण्यात आल्या आहेत. त्या पळून गेलेल्यांचा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. प्रीती टिपरे यांनी दिली.

Back to top button