सोलापूर : मोहोळ दुहेरी खुनातील अटक आरोपीच्या भावावर खुनीहल्ला | पुढारी

सोलापूर : मोहोळ दुहेरी खुनातील अटक आरोपीच्या भावावर खुनीहल्ला

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मोहोळमधील दुहेरी खून प्रकरणातील अटक आरोपीच्या भावावर तलवारीने खुनीहल्ला करण्यात आला. बुधवारी (दि. 22) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत गुरुवारी रात्री उशीरापर्यंत मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा हल्ला 5 जणांनी केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे पोलिसांकडून समजले.

मोहोळ मध्ये शिवसेनेच्या सतिश क्षिरसागर व विजय सरवदे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी हॉटेलवर जेवणास बोलाविेले होते. जेवण करून वरील दोघे मोटारसायकलवर गावाकडे जात असताना त्या दोघांना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोने उडविले होते. यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला होता.

तर दुसर्‍याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. घटनेनंतर दुसर्‍या दिवशी टेम्पोचालक हा मोहोळ पोलिस ठाण्यात हजर झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मोहोळ पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून हा अपघात नसून राजकीय वादातून खून झाला आहे. तेंव्हा पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून या प्रकरणा खूनाचा गुन्हा दाखल केला. तेंव्हा या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य 5 आरोपीहे महिनाभर फरारी होते. दरम्यान, अनेक संघटनांनी त्या फरार आरोपींना अटक करा अशा आशयाचे निवेदन पोलिस अधीक्षकांना दिले होते.

त्यानंतर मोहोळ पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार त्या मुख्य आरोपींना कर्नाटकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अटक आरोपी गोट्या सरवदे याचा भाऊ शैलेश संगम सरवदे (वय 21 रा. क्रांतीनगर, मोहोळ) याच्यावर 22 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मोहोळ मध्ये 5 जणांनी तलवारीने खुनीहल्ला केला.

यात जखमी झालेल्या शैलेश सरवदे याच्यावर सोलापूरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात 23 सप्टेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button