मुंबईत सीएनजी, पीएनजी दरात २ रुपयांचा भडका!

मुंबईत सीएनजी, पीएनजी दरात २ रुपयांचा भडका!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या दरात 62 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर मुंबईत सीएनजी आणि पीएनजी दरवाढीचा भडका उडाला आहे. केंद्र शासनाने 1 ऑक्टोबरपासून केलेल्या दरवाढीचा दाखला देत मुंबईत सीएनजी आणि पीएनजी पुरवठादार महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजी आणि पीएनजीच्या दरात प्रत्येकी किलोमागे 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 4 व 5 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केल्याचे एमजीएलने सोमवारी रात्री जाहीर केले.

एमजीएलने दिलेल्या माहितीनुसार, गॅसिफाईड एलएनजीच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहचल्याने एमजीएलद्वारे खरेदी केलेल्या गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

परिणामी, एमजीएलने वाढीव गॅसची किंमत वसूल करण्यासाठी सीएनजीच्या मूळ किमतीत 2 रुपये प्रतिकिलो आणि पीएनजीच्या किमतीत 2 रुपये प्रति एससीएमने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि आसपासच्या महानगरात ही दरवाढ 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून व 5 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू केल्याचे एमजीएलने स्पष्ट केले आहे.

एमजीएलच्या या नव्या दरवाढीमुळे मुंबईतील वाहनचालकांना आता सीएनजी भरण्यासाठी 54.57 रुपये प्रतिकिलो दराने पैसे मोजावे लागणार आहेत. याउलट पीएनजी वापरकर्त्या ग्राहकांना प्रति एससीएमच्या पहिल्या स्लॅबसाठी 32.67 रुपये आणि दुसर्‍या स्लॅबसाठी 38.27 रुपयांचा भुर्दंड पडणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news