'राज्यातील 'या' भागात पुढील ४८ तास उष्णतेचे; तर काही ठिकाणी पावसाची हजेरी' | पुढारी

'राज्यातील 'या' भागात पुढील ४८ तास उष्णतेचे; तर काही ठिकाणी पावसाची हजेरी'

पुढारी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने आज ( दि. ३१) आणि गुरुवार १ जून रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज (दि.३१) राज्यातील काही ठिकाणी पावसाने विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने (Thunderstorm with lightning) हजेरी लावली. दरम्यान हवामानात बदल जाणवत असून, पुढील ४८ तास महाराष्ट्रासह, कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे.

पुढील दोन दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. दरम्यान, ३१ मे आणि १ जून रोजी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढचे तीन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल नाही, असे हवामान विभागाकडून स्पष्ट (Thunderstorm with lightning) करण्यात आले आहे.

Thunderstorm with lightning: पुढील पाच दिवस राज्यात तुरळक पाऊस

आज संपूर्ण मध्य महाराष्ट्रासह दक्षिण कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. १ जूनला संपूर्ण महाराष्ट्र वगळता केवळ दक्षिण कोकण किनापट्टी तर ४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २ जून आणि ३ जून ला राज्यात हवामान कोरडे राहिल, असे हवामान विभागाने म्‍हटलं आहे.

हेही वाचा:

 

Back to top button