Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांच्या सेवेसाठी सज्ज; उद्घाटनासाठी कोकण रेल्वे मार्गावर दाखल | पुढारी

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांच्या सेवेसाठी सज्ज; उद्घाटनासाठी कोकण रेल्वे मार्गावर दाखल

रत्नागिरी; दीपक शिंगण : आयसीएफ चेन्नई येथून निघालेली आठ डब्यांची नवीकोरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मडगाव – मुंबई मार्गावरील उद्घाटन सोहळ्यासाठी रवाना झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मडगाव – मुंबई वंदेभारत एक्सप्रेस लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. तत्पुर्वी उद्धघाटनसोहळ्यासाठी दाखल होण्याकरिता चेन्नईहून निघालेली वंदे भारत एक्सप्रेस गोव्यात दाखल होत आहे. (Vande Bharat Express)

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी अलीकडेच यशस्वीपणे घेण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचे निश्चित तारीख अजूनही जाहीर झाली नाही. वंदे भारत एक्सप्रेस कोकणमार्गावर धावण्याची तयारी झाली आहे. कोकणवासियांची प्रतीक्षा अवघ्या काही तासात संपवून वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांच्या सेवेत दाखल होईल. (Vande Bharat Express)

वंदे भारत एक्सप्रेसचे लेटेस्ट अपडेट (Vande Bharat Express)

नव्या कोऱ्या आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेसने शनिवारी (२७ मे ) रात्री १० वाजून ३२ मिनिटांनी उडपी स्थानक सोडून ही रिकामी गाडी मडगाव स्थानकाकडे मार्गस्थ झाली होती.

हिरवा कंदिलाची प्रतिक्षा

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत एक्सप्रेसला गोव्यातील मडगाव जंक्शनवरून मुंबईतील सीएसएमटीपर्यंत धावण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर तयारी देखील करण्यात आली आहे.

अधिक वाचा :

Back to top button