

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : वाचकांचा विक्रमी प्रतिसाद लाभलेल्या दैनिक 'पुढारी'च्या न्यू इयर धमाका 2022 या वाचक बक्षीस योजनेच्या पहिल्या क्रमांकाचे विजेते होण्याचा मान तिघा वाचकांना मिळाला. यामध्ये संतोष पाटील यांना अॅक्टिव्हा, यशश्री पोतदार यांना अॅक्सेस, तर रवींद्न हणमंत ओंकार यांना इलेक्ट्रिक बाईक हे बक्षीस मिळाले. हे तिघेही पहिल्या क्रमाकांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे या बक्षीस योजनेची सोडत जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी वाचकांच्?या उपस्थितीत काढ?ण्यात आली. दैनिक 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या योजनेबद्दल गेल्या काही दिवसांपासून उत्कंठा लागून राहिली होती. सोडतीद्वारे वाचकांना भरघोस बक्षिसे मिळाल्?याने वाचकांमधून समाधान व्?यक्?त करण्?यात येत आहे.
महाराष्ट्रभर 'पुढारी' वाढला ः बलकवडे
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे म्हणाले, महाराष्ट्रभर दैनिक 'पुढारी' आता वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर राज्यभरात 'पुढारी'चे वाचक मोठ्या प्रमाणात आहेत. वाचकांशी 'पुढारी'ची नाळ चांगली जोडली आहे. सर्व महाराष्ट्रभर 'पुढारी' आता ताकदीने वाढत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत 'पुढारी'चे मोठे योगदान आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी 'पुढारी'ने नेहमीच सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालून ते प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे. 'पुढारी' चुकीच्या धोरणाविरोधात नेहमीच आवाज उठवितो आणि चांगल्याचे कौतुकही करतो, असे सांगितले.
पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार
गणेशोत्सवामध्ये काटेकोर नियोजन केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांचा, तर जिल्ह्याच्?या ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचा दैनिक 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित प्रेक्षकांनीही या सत्काराला टाळ्या वाजवून दाद दिली.
अशी झाली पारदर्शक सोडत
या योजनेत पहिल्या क्रमांकासाठी बाईक, दुसर्या क्रमांकासाठी कलर टीव्ही, तिसरे बक्षीस स्मार्ट वॉच, तर चौथे बक्षीस ब्लू टूथ आहे. योजनेची सोडत पारदर्शक पद्धतीने झाली. जानेवारी 2022 ते मे 2022 या कालावधीसाठी ही योजना होती. सुरुवातीला सर्व कूपन एका काचेच्या बॉक्समध्ये एकत्र करून प्रत्येक बक्षिसाच्या स्वतंत्र चिठ्ठ्या काढत विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. प्रत्येक बक्षिसासाठी स्वतंत्र काचेच्या बरण्यांची व्यवस्था करण्यात आली. 1 ते 6 क्रमांकाच्या बक्षिसांची सोडत काढली. प्रमुख पाहुण्यांसोबतच वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या हस्तेदेखील सोडत काढण्यात आली.
कार्यक्रमास 'पुढारी'चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, सरव्यवस्थापक (वितरण) डॉ. सुनील लोंढे यांच्यासह महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लाड, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष किरण व्हनगुते, कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघाचे संघटक शंकर चेचर, महालक्ष्मी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केदार पाटील, संभाजीनगर वृत्तपत्र विक्रेता डेपोचे अध्यक्ष बजरंग पाटील, राजारामपुरी वृत्तपत्र डेपोचे अध्यक्ष प्रफुल्ल कोतमिरे, तसेच कावळा नाका डेपोचे सुंदर मोरे, हिंदुराव कदम, सुरेंद्र चौगुले, श्रीकांत सावेकर,परशुराम सावंत, रमेश जाधव, रणजित आयरेकर, धनंजय शिराळकर, अंकुश परब, समीर कवठेकर, अमर जाधव, सुरेश ब—ह्मपुरे, इंद्रजित पोवार, सतीश दिवटे, रवी खोत, चंद्रकांत भोसले, सागर कोरे, सेजल कोरे, सुजित लाड आदी उपस्थित होते. विश्वराज जोशी यांनी सुत्रसंचालन केले. साहाय्यक वितरण व्यवस्थापक शिवाजी पाटील, उत्तम पालेकर, अमर पाटील, अशोक पाटील, उमेश सूर्यवंशी, अक्षय पाटील, मंदार जाधव, प्रयोग समन्वयक विक्रम रेपे यांनी परिश्रम घेतले. मनोरंजनासाठी राम भोळे यांच्या सदाबहार हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.
अन्य विजेत्यांची नावे
बक्षीस क्रमांक 1 बाईक (3)
1) अॅक्टिव्हा -संतोष शामराव पाटील प्लॉट नं. 2, साईसमर्थ कॉलनी, पोवार कॉलनी, पाचगाव, 2) अॅक्सेस -यशश्री अमर पोतदार- सासने कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर, 3) इलेक्ट्रिक बाईक – रवींद्र हणमंत ओंकार -690/85, बी वॉर्ड, संभाजीनगर, कोल्हापूर.
बक्षीस क्रमांक 2 – कलर टीव्ही (4)
1) रिया मनोज सोरप – चिले कॉलनी, नेहरूनगर, कोल्हापूर, 2) मारुती सीताराम नारकर – स्वाधार नगर, शेंडा पार्क कोल्हापूर, 3) रोहित हरिराव फराकटे – वडणगे, सासने मळा, ता. करवीर, 4) शोभा तानाजी जाधव – प्लॉट नं. बी 26, कणेरकर नगर, कोल्हापूर.
बक्षीस क्रमांक 3 – स्मार्ट वॉच (7)
1) शुभांगी सखाराम गावडे – 2821, बी वॉर्ड, मंडलिक वसाहत, मंगळवार पेठ, कोल्हापूर, 2) विनायक हिंदुराव पाटील – 947 बी, प्रभानंद कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले दवाखान्याजवळ, टेंबे रोड, कोल्हापूर, 3) राजेंदकुमार अनंत नेर्लेकर – फ्लॅट नं. 304, श्रवणप्राईड अपार्टमेंट, कदमवाडी रोड, कोल्हापूर, 4) मुरलीधर बचाराम कट्यार -917/8, गांधीनगर, कोल्हापूर, 5) दामोदर अच्युत्य जोग – 2596 ए, कमला निवास, देशपांडे गल्ली, खरी कॉर्नर, कोल्हापूर, 6) अय्यान आरिफ कच्छी – 139 ई वॉर्ड, यादवनगर, कोल्हापूर, 7) राजेंद्र वसंतराव पोवार – हरिओमनगर, अंबाई टँक, कोल्हापूर.
बक्षीस क्रमांक 4 – ब्लू टूथ हेडफोन (9)
1) वसिम कुतुबुद्दीन शेख – 25/12, प्लॉट नं. 57, मेनन कॉलनी, अमृतनगर, सरनोबतवाडी, 2) सुनील दिनकर शिंदे – 3026 ए वॉर्ड, गुरुवार पेठ, कोल्हापूर, 3) कृष्णात दादू इंगळीकर – मेन रोड, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 4) उषा प्रताप धुमाळ – सोन्यामारुती चौक, घर नं. 2651, सी वॉर्ड, कोल्हापूर, 5) राजू बाबू भालदार – 595, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर, 6) आसिफ अब्दुल सत्तार पटवेगार – 278/8, लक्ष्मी वसाहत, जवाहरनगर, कोल्हापूर, 7) योगेश महादेव शेळके – 690/160, ओम गणेश कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर, 8) यशवंत शंकर लोखंडे – मु. पो. शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 9) विवेक विश्वास चौगले – न्यू शाहूपुरी, ई वॉर्ड, 318, कोल्हापूर.