Chief Minister Majhi Ladaki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना

’लाडक्या बहिणीं’साठी महापालिका यंत्रणा कामाला

शहरभरात 123 केंद्र; घरोघरी जाऊनही अर्ज भरणार
Published on

पिंपरी : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा कामाला लावली आहे. शहरात येत्या बुधवार (दि.10) पासून 123 केंद्र तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी 550 पेक्षा अधिक मनुष्यबळ नेमले जाणार आहे. तसेच, महिला बचत गटांकडून घरोघरी जाऊनही अर्ज भरून घेतले जाणार आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

31 ऑगस्ट पर्यन्त केंद्र सुरू

या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे आदी उपस्थित होते. आयुक्त सिंह म्हणाले की, योजनेच्या प्रसिद्धीसाठी सोशल मिडीया, संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी माहितीदर्शक स्टॅडीज, फ्लेक्स, बॅनर्स सर्व क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत लावण्यात येत आहेत.

योजनेचे माहितीदर्शक व्हिडीओ, मेसेजेस, जिंगल्स तयार करून प्रसारित करण्यात येत असून, योजनेची माहितीदर्शक भित्तीपत्रके, हस्तपत्रिका आणि माहितीपत्रके तयार करण्यात येत आहेत. शहरात 123 केंद्रे असणार आहेत. एका केंद्रावर समन्वयक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मदतनीस, सुरक्षा कर्मचारी अशा 5 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे केंद्र 31 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकृतीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. महिलांनी आपल्या घरांजवळील केंद्रांवर अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Chief Minister Majhi Ladaki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेला तांत्रिक अडथळ्यांची शर्यत

अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण

दरम्यान, महापालिकेच्या यंत्रणा सरकारने कामाला लावल्यामुळे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण वाढला आहे. त्याचा परिणाम पावसाळी कामे व दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रक्कम न मिळाल्यास महापालिका देणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. रक्कम न मिळाल्यास महापालिका देणार का, या प्रश्नावर आयुक्त म्हणाले की, राज्य शासनाने महापालिकेस योजनेसाठी शहरभरात जनजागृतीसह अर्ज घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, अंमलबजावणी करण्यात येत आहे. विरोधकांबाबत मी काही बोलू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news