तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच काढला काटा

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक
Deceased criminal Dhanjya Gajanan Gorgale
मृत गुन्हेगार धनज्या गजानन गोरगलेFile Photo

पिंपरी : तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्याचे समजल्यानंतर नऊ ते दहा जणांनी मिळून एका सराईत गुन्हेगाराचा काटा काढला. ही घटना सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास पुनावळे येथे घडली. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी सराईत तुरुंगात होता. एक महिन्यांपूर्वीच तो बाहेर आला होता. दरम्यान, पोलिसांनी आता संबंधित माजी नगरसेवकाला सराईताच्या खून प्रकरणी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माजी नगरसेवकाला अटक

अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (३५, रा. पुनावळे गावठाण), असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. तर, सूरज मुरलीधर गाडे (रा. गहूंजे), हा देखील या हल्ल्यात जखमी झाला आहे. पोलिसांनी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ याला अटक केली आहे. तर, इतर नऊजण फरार झाले आहेत. याप्रकरणी समीर गोरगले (वय ३३) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Deceased criminal Dhanjya Gajanan Gorgale
कोल्हापूर : गर्भलिंग निदान टोळीचा सूत्रधार डॉक्टर, साथीदार सराईत गुन्हेगार

कसा झाला हल्ला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरगले त्याच्या मित्रासोबत पुनावळे येथील समाधान हॉटेलच्या मागील बाजूस बसला होता. त्यावेळी आरोपींनी गोरगले याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

नगरसेवकाच्या हत्याचा कट

मागील वर्षी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गोरगले याच्यासह इतर दोघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले होते. त्यांच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली होती. पोटनिवडणुकीत झालेल्या वादातून खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, यामागे इतर काहीतरी कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रावेत पोलिस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news