

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब आणि झी मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरी व्हॅलेंटाईन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कस्तुरी क्लब नेहमीच सभासदांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
14 फेब्रुवारी हा प्रेमाच्या नात्याचा दिवस म्हणू जगभर साजरा केला जातो. परस्पर नात्यांचे सेलिब्रेशन करण्यासाठी 'उत्सव नात्यांचा' हा झी मराठी प्रस्तुत मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सभासद महिलांना झी मराठीच्या मालिकेतील कलाकरांशी मनसोक्त गप्पा मारता येतील.
झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' फेम कश्यप परुळेकर, राघव आणि पल्लवी पाटील, तसेच 'तू चाल पुढं' या मालिकेतील दीपा परब यांच्याशी सभासदांना दिलखुलास गप्पा मारता येणार आहेत. या शिवाय या कलाकारांचे नृत्याविष्कार, गाणी असा रंगारंग कार्यक्रम अनुभवता येईल. यात महिलांसाठी बेस्ट जोडी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक गंधर्व रिसॉर्ट हे आहेत. या कार्यक्रमाचे गिफ्ट स्पॉन्सर वामाज सारीज हे आहेत.
सूचना : प्रत्येक सभासदांनी आय कार्ड व आपला पास कार्यक्रमाच्या ठिकाणी सोबत ठेवावा. प्रत्येक उपस्थित सभासदाला अल्पोपहार मिळणार आहे. फक्त पासधारकाला प्रवेश मिळेल. अधिक माहितीसाठी – 8805024242, 8329572628.
'बेस्ट जोडी' स्पर्धा विजेत्यांना सिल्क साडी
आपल्या घरातील नात्यातील आई-मुलगी, सासू-सून, जावा -जावा, बहिणी-बहिणी अशा स्वरूपाच्या जोड्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. सहभागी घेणार्या जोडीतील एक सदस्य कस्तुरी सभासद असणे आवश्यक आहे. यामध्ये एक बेस्ट जोडी निवडली जाणार आहे. त्यांना सिल्क साडी देण्यात येणार आहे.
पैठणीची मानकरी
उपस्थित सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून एका विजेत्या सभासदास वामाज सारीजकडून पैठणी मिळणार आहे. लकी ड्रॉसाठी लाल रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा व सोबत एक लाल रंगाचा फुगा घेऊन यायचे आहे.