रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मुसळधार पाऊस | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मुसळधार पाऊस

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा :  पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुनः एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने धमाकूळ घातला होता. आता शनिवारपासून म्हणजे उद्यापासून पन्हा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार दि. 23 जुलैपासून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पावसानंतर सध्या गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरींची हजेरी पावसाने लावली. मात्र, त्यामध्ये सातत्य नव्हते तर त्यामुळे बराच वेळ उन्हाने वातावरण कोरडे राहत होते.

Back to top button