

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाले असून आज शनिवारी (दि. 3) गौरीचे आगमन होत आहे. गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपतीसाठी भक्त सुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. यानिमित्ताने गौरी गणपती आरास स्पर्धा दै. 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेकरिता अर्जुन ऑईल गडहिंग्लज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कस्तुरी क्लब नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून 'गौरी-गणपती आरास' स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गौरी-गणपतींच्या सजावटीचा फोटो तसेच 40 सेकंदांचा व्हिडीओ पाठवायचा आहे. त्यामध्ये तुमचे नाव, तुमचा संपूर्ण पत्ता आणि कस्तुरी क्लब सभासद कार्ड नंबर 3 ते 11 सप्टेंबरअखेर खालील व्हॉटस् अॅप नंबरवर त्या त्या विभागानुसार पाठवायचे आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क कोल्हापूर ः 8805007724 आणि गडहिंग्लज – 9423539561. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे अर्जुन ऑईल तर्फे सात, पाच आणि तीन लिटर खाद्यतेल बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांचे फोटो पुढारी कस्तुरीच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात येतील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
या स्पर्धेत कस्तुरी क्लब सभासदांनाच सहभागी होता येणार आहे. सभासद नसणार्या महिलांना कस्तुरी क्लबचे सभासदत्व स्वीकारून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सभासद होताच बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टीलचा थर्मास हमखास गिफ्ट मिळणार आहे. सोबतच विविध मोफत गिफ्ट, डिस्काऊंट कूपन्स आणि लकी ड्रॉ याचा देखील लाभ सभासद महिलांना मिळणार आहे.