

वारणावती : पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरण परिसरात पावसाची संतधर कायम आहे. गेल्या 24 तासात 77 मिलिमीटर पावसासह आजअखेर 972 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून येथे अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे दररोज एक ते दीड टीएमसी पाण्याची वाढ धरणात होत आहे. सध्या धरण 62.61 टक्के भरले आहे. धरणात 21.54 टीएमसी पाणीसाठा आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा 14.66 टीएमसी असून त्याची टक्केवारी 53.27 इतकी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. सध्या 12,486 क्युसेक्स पाण्याची आवक धरणात होत आहे. पाणीपातळी 609.983 मीटर इतकी आहे.