

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील आठ आमदार महाविकास आघाडीकडे, तर दोन आमदार भाजपकडे राहतील. आ. पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, राजूबाबा आवळे हे काँग्रेसचे, हसन मुश्रीफ, राजेश पाटील हे राष्ट्रवादीचे, प्रकाश आबिटकर शिवसेनेचे, राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवसेनेचे सहयोगी हे महाविकास आघाडीबरोबर राहतील. प्रकाश आवाडे, विनय कोरे हे भाजपबरोबर राहतील. दरम्यान, विनय कोरे यांनी आपण सुरुवातीलाच भाजपला पाठिंबा दिला असून आपल्याकडे मतासाठी पुन्हा महाविकास आघाडीने संपर्क साधलेला नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.