कोयता गॅंग | भय इथले संपत नाही..!

वाकडच्या गणेशनगरमध्ये कोयत्याने वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच
Koyta Gang's terror continues in Pimpri
पिंपरीत कोयता गॅंगची दहशत सुरूच पुढारी
Published on
Updated on

पिंपरी : वाकड पोलिस ठाण्यापासून अंतरावर असलेल्या गणेशनगरमध्ये रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलांनी पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे. हातातील कोयते हवेत फिरवून रस्त्यावर पार्क केलेल्या सहा ते सात वाहनांची तोडफोड केली. तसेच, शस्त्राचा धाक दाखवून एकाच्या खिशातून 1700 रुपये काढून घेतले. यातील विशेष बाब म्हणजे तोडफोड करीत असताना आरोपींनी रिल्स बनवली आहे. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री दोनच्या सुमारास घडली.

गणेशनगर परिसरात यापूर्वीही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भय इथले संपत नाही..!, अशीच काहीशी परिस्थिती येथे पहावयास मिळते. याप्रकरणी चेतन तापकीर (रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना CCTV मध्ये कैद

वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अल्पवयीन आरोपींनी आपसात संगनमत करून रस्त्यावर पार्क केलेल्या सात वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. याबाबत माहीती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये दोघेजण स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तपास वाकड पोलिस करत आहे.

Koyta Gang's terror continues in Pimpri
Pune Crime news : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयता हल्ला करणाऱ्याला जामीन

यापूर्वीही फोडली होती वाहने

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने यापूर्वी देखील वाहनांची तोडफोड केली होती; मात्र वय कमी असल्याने त्याची लगेच सुटका झाली होती. त्यानंतर त्याने आता पुन्हा वाहने फोडल्याने संताप व्यक्त होत आहे.

रिल्ससाठी केली तोडफोड...

सोशल मीडियावर रिल्स टाकायचे, हे रिल्स पाहून लोकांनी आपल्याला भाई म्हटले पाहिजे, लोक आपल्याला घाबरायला हवेत, या हेतूने अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड केली आहे. साधे रिल्स टाकल्यावर त्याला व्ह्यूज् मिळत नाहीत, गुन्हेगारीचे रिल्स टाकले की जास्त व्ह्यूज् मिळतात, दहशत पसरते, या मानसिकतेतून या मुलांनी फक्त रिल्ससाठी वाहनांची तोडफोड केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग

शहरातील अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे चित्र समोर येत आहे. रात्रीच्या वेळी चोरी, हाणामारी तसेच वाहनांची तोडफोड करण्यात अल्पवयीन मुले असल्याचे पोलिस तपासात अनेकदा समोर आले आहे. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी असते, कोणी अनधिकृतपणे शस्त्र बाळगत असेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येते. असे असताना अल्पवयीन मुलांकडे शस्त्र कसे येतात, अल्पवयीन मुलांना शस्त्र पुरवून त्यांच्याकडून गुन्हे करून घेण्याचे एखादे रॅकेट शहरात सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाई बनण्याची ‘क्रेज’

आपल्या परिसरात आपल्याला भाई म्हणून ओळखले गेले पाहिजे, सर्वांनी आपल्याला घाबरायला हवे, यासाठी अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीची वाट पकडत आहे. या अल्पवयीन मुलांना

गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून दिशा उपक्रम राबवला जात आहे. मात्र, तरी देखील शहरातील अनेक अल्पवयीन मुलामध्ये भाई बनण्याची क्रेज असल्याचे दिसून येते.

वाकडमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वाहांनाची तोडफोड केली आहे. दहशत पसरविणे आणि सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी त्यांनी वाहनांची तोडफोड केली आहे. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news