झिका व्हायरसचा गोव्याला धोका? पुन्हा एकदा राज्यात भीतीचे वातावरण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूुळे गोवा राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणि यातच झिका विषाणूचे दहापेक्षा अधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. यापूर्वी इतर राज्यातही या विषाणूचे रुग्ण आढळले असल्याचे वृत्त आहे. हा व्हायरस 'एडिस' डासाच्या चाव्यामुळे होतो.

गोव्यामध्ये केरळमधून पर्यटकांची आणि लोकांची ये-जा सुरूच आहे. या लोकांकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र
असले, तरी त्याचा संबंध 'झिका ' विषाणूशी नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आतापर्यंत राज्यात 'झिका'चा एकही रुग्ण आढळलेला नाही. येथून पुढे या विषाणूबाबतची लक्षणे असणारा रुग्ण आढळल्यास त्याचे नमुने राष्ट्रीय व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक आरोग्य सूत्रांकडून मिळाली.

झिकाचा प्रसार प्रवाशांकडून होत असल्याची माहिती आणि यासंबंधीचा इशारा वारंवार जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

या आजाराची लागण झालेला रुग्ण जर प्रवास करून एखाद्या ठिकाणी गेला. आणि त्याला चावलेला एडिस जातीचा डास दुसर्‍या
व्यक्तीला चावला तर झिकाचा प्रसार होतो. गोेकॉ येथे व्हायरॉलॉजी लॅबचे काम सुरू झाले आहे.

मात्र, अद्याप ही प्रयोगशाळा सुरूक्ष् झाली नाही. त्यामुळे झिकाची लक्षणे असणारे रुग्ण आढळलेच तर त्यांचे नमुने पुणे किंवा हैदराबाद येथेच पाठविले जाणार असल्याची माहिती मिळाली.

कोरोना आणि झिका हे दोन वेगळे विषाणू आहेत. कोरोनाच्या बाबतीत मुख्यतः लाळेची तपासणी केली जाते. तर 'झिका'च्या बाबतीत मूत्र आणि रक्ताची तपासणी होते.

झिका व्हायरसची लक्षणे…

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंग दुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरलदरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे
लाल होणे, अशक्‍तपणा आणि थकवा ही देखील या व्हायरलची प्रमुख लक्षणे आहेत.

मात्र, सुरुवातीला आलेल्या तापावरून 'झिका' व्हायरस कळणे थोडे कठीण आहे.

गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका

सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो.

गर्भवती महिलांध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात.

तसेच बाळाला विविध आजार होण्याची देखील शक्यता असते.

मच्छरांची पैदास रोखणे हाच उपाय

आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. घरात फार दिवस पाणी साठवून न ठेवणे, अशी काळजी घेणे आवश्यक आहे. मच्छरांची पैदास रोखूनच या विषाणूचा धोका कमी केला जाऊ शकतो.

'एडिस'या डासाुंळेच प्रसार : डॉ. महात्मे

चिकुनगुनिया आणि डेंग्यू रोगाचा प्रसार 'एडिस' जातीच्या मच्छराुंळे होतो. याच मच्छराुंळे झिका व्हायरसचा प्रसार होतो, अशी माहिती
आरोग्य खात्यातील डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news