

चतरा, पुढारी ऑनलाईन : झारखंड पोलिसांनी गुरूवारी कुख्यात नक्षली रमेश गंजू उर्फ आझाद याला अटक केलेली आहे. त्याने आतापर्यंत ३० पोलिसांची हत्या केलेली होती. त्याच्यावर १५ लाखांचं बक्षिसही जाहीर करण्यात आलं होतं.
रमेश गंजूने पोलिस आणि सीआरपीएफ सुरू केलेल्या अभियान बंद पाडलेलं होतं. त्यांच्यावर बिहार आणि झारखंडमध्ये ४५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तो जंगलामध्ये सुरुंग लावण्यात एक्पर्ट होता.
डीआयजी नरेंद्र कुमार सिंह यांनी माहिती दिली की, रमेश गंजूने मागील २०-३० वर्षांमध्ये ३० पोलिसांची हत्या करण्यात सहभागी होता.