

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर पाऊस अपडेट : सलग बरसणाऱ्या संततधार पावसामुळे राधानगरी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक पुर्णपणे बंद झाली. कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला. फोंडा,कणकवलीकडे जाणारी वाहणे, एस.टी.बसेस सुरक्षित ठिकाणी थांबल्या आहेत. पावसाची संततधार सुरुच आहे. तसेच कोल्हापूर रत्नागिरी महार्गावरील आंबा परिसरात रस्ता खचल्याने वाहतुक खोळांबली आहे. तर पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे.
कोल्हापूर पाऊस अपडेट
कोल्हापूरहून भोगावती, कौलव, राधानगरीहून कोकणकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला आहे.
हळदी, म्हाळुंगे, परिते, भोगावती याठिकाणी असणाऱ्या ओढ्यावर पाणी आले आहे. तरी जवळच असणाऱ्या नदीपात्राचे पाणी रस्त्यावर आले आहे.
हळदी, राशिवडे, राधानगरी कडे जाणारा जिल्हामार्ग येळवडे, शिरगाव येथील ओढ्यावर पाणी आल्याने बंद झाला आहे.
कोकणकडे जाणाऱ्या बसेस,खाजगी वाहतुक जागा मिळेल त्याठिकाणी सुरक्षित ठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत.
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला जवळील पेट्रोल पंप पूर्ण पाण्याखाली गेला आहे.
तसेच बीड शेड ते शिरोली दुमाला पेट्रोल पंपापर्यंत मार्ग खुला आहे.
आरळे गावापर्यंतच्या मुख्य राज्य मार्गावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पर्यायी रस्ता सुद्धा बंद आहे, कांचनवाडी ते भाटण वाडी रस्ता बंद आहे.
शिरोली दुमाला, सडोली दुमाला,सावर्डे दुमाला, चफोडी ,गर्जन, आरळे पर्यंत चा मुख्य राज्य मार्ग बंद आहे. याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बरेच रस्ते बंद झाले आहेत.
जाधववाडी निळे या ठिकाणी पाणी आलेने कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे बंद झाला आहे.
तसेच बरकी गावाच्या पुलावर पाणी आल्याने बरकीचा संपर्क तुटलेला आहे.
मालेवाडी ते सोंडोलीला जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने शित्तुर वारून, शिराळे वारून, उखळू, खेडे, सोंडोलीकडे रस्ता बंद झालेला आहे.
सोष्टेवाडी जवळ पाणी आल्याने मलकापूर ते अनुस्कुरा रोड बंद झाला. तसेच कडवी नदी पुलावर पाणी आलेने मलकापूर ते शिरगाव रोड बंद झालेला आहे.
चरण ते डोणोली रोड बंद झाला. नांदारी फाट्यावर पाणी आलेने करंजफेन, माळापुडे, पेंढाखले रोड बंद झाला. करुंगळे ते निळे व कडवे ते निळे रोड बंद आहे तसेच उचत ते परळे रोड बंद झाला
वेदगंगा नदीवरील मुरगूड ते कूरणी हा बंधारा पाण्याखाली गेला आहे, पर्यायी रस्ता- निढोरी मार्गे कागल वेदगंगा नदीवरील सुरुपली ते मळगे हा बंधारा पाण्याखाली गेला आहे.
पर्यायी रस्ता- सोनगे ते बानगे यासह वेदगंगा नदीवरील बस्तवडे ते आणुर पुल पाण्याखाली गेला आहे.
पर्यायी रस्ता- निपाणी मार्गे कागल कोल्हापूर, सोनगे ते बानगे मार्गे आणूरवरील सर्व वाहतूक ही बॅरिकेट लावून बंद करण्यात आली आहे.
आपत्तिजनक परिस्थितीमध्ये, स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक 1077 अथवा मुरगूड पोलिस स्टेशन क्रमांक +912325264333 या वर संपर्क साधावा.
याचबरोबर गडहिंग्लज तालुक्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला असून, नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत.
हिरण्यकेशीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे.
यामुळे ऐनापूर, जरळी, निलजी, नांगनूर बंधारे सकाळीच पाण्याखाली गेले आहेत.
तर दुपारी बारा वाजता भडगाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी संततधार सरींनी ओढ्या-नाल्यांनी प्रवाह बदलल्याने राज्य तसेच जिल्हा मार्गांवर पाणी आले. जरळी व निलजी बंधारे पाण्याखाली गेल्याने पूर्व भागाचा पूर्णतः संपर्क तुटला आहे.
याशिवाय हलकर्णी-बसर्गे रस्त्यावरील ओढ्यावर पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीस बंद झाला आहे.
पावसाने गडहिंग्लज शहरात पुरती दैना उडाली आहे.
सकाळी लाखेनगरातील ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी आले.
या ठिकाणी सिमेंट विक्रीच्या गोडावूनमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
याशिवाय लक्ष्मी मंदिर परिसरासह अन्य कॉलन्यांमध्ये गटारींचे पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात समस्या आल्या. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.
मेटाच्या मार्गावर पूर्णतः पाणी आल्याने या ठिकाणच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले होते.
नदीवेस परिसरात नव्या स्मशानशेडपर्यंत पाणी आले होते.
कोल्हापूर पाऊस अपडेट
भुदरगड तालुक्यात धुवाँधार पाऊस सुरू असुन पावसाने तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. गारगोटी-कोल्हापूर, पिंपळगाव, शेळोली मार्गावर ठिकठिकानी पुराचे पाणी आल्याने वाहतुक बंद पडली आहे. तर गारगोटी शहरात रस्त्यावरील पाणी काही घरात शिरले आहे.
बुधवार दुपारनंतर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसाबरोबरच जोराचा वारा यामुळे वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे.
ठिकठिकानी नदी नाल्याचे पाणी रसत्यावर आल्यामुळे तालुक्यातील वाहतुकीसह जनजीवन ठप्प झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रस्तेही पाण्याने भरून वाहतांना दिसत आहेत.
सकाळी 10.30 वा. सुमारास गारगोटी-कोल्हापूर रोडवर कुर पुलानजीक पाणी आले होते.
कलनाकवाडी येथेही रस्त्यावर पाणी आले आहे. पांगीरे येथील ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने पिंपळगाव, उत्तूर, गडहिंग्लज होणारी वाहतुक बंद पडली आहे.
या मार्गावरची वाहतुक कापशी मार्गे वळविण्यात आली.
शेळोली मार्गावर गारगोटी-सालपेवाडी दरम्यानच्या ओढ्यावर, पुष्पनगर नजीक किल्ले भुदरगड फाट्यानजीकच्या ओढ्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद पडली होती.
देऊळवाडी नांदोली दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरीलही वाहतुक बंद झाली आहे.
बुधवार रात्री पासुन पावसाने अधिकच जोर धरला असुन नदी नाल्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
वेदगंगा नदीवर सुक्याचीवाडी, दासेवाडी, ममदापूर, करडवाडी, शेळोली, शेणगाव, आकुर्डे, म्हसवे, निळपण, वाघापूर हे दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पाटगाव मौनीसागर जलाशयात 183 मीमी इतक्या उच्यांकी पावसाची नोंद झाली असुन जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. जलाशयात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोंडोशी, वासनोली लघु प्रकल्प भरला असुन फये, मेघोली भरण्याच्या मार्गावर आहेत.