

कोपार्डे / कसबा बावडा / शिरोली दुमाला : पुढारी वृत्तसेवा कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली. चंद्रदीप नरके कारखान्याच्या सत्तेवरील आपली मांड पक्की ठेवत त्यांनी सलग चौथ्यांदा विजय संपादन केला आहे. १५ वर्षांच्या सलग सत्तेनंतर नरके यांना सभासदांनी पुन्हा पाच वर्षांसाठी संधी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलने सर्वच्या सर्व २३ जागांवर निर्णायक आघाडी मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. रात्री उशिरापर्यंत तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू होती.
कुंभी कासारीचा सामना माजी आ. चंद्रदीप नरके विरुद्ध आ. पी. एन. पाटील समर्थकांत होता. आजी-माजी आमदारांत सामना होत असल्याने राजकीय पातळीवर, विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो चर्चेचा विषय ठरला होता. नरके यांच्या विजयाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नव्याने आकाराला येण्याची चिन्हे आहेत. नरके यांना आमदार सतेज पाटील यांची तर पाटील यांना आमदार विनय कोरे यांची साथ लाभली होती..
पहिल्या फेरीत विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे १८ उमेदवार तर सत्ताधारी नरके पॅनेलचे ५ उमेदवार आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीत करवीर तालुक्यातील १८ गावांतील ३५ केंद्रांची मतमोजणी झाली. या गावांतून विरोधी पॅनेलला १०० ते ५०० च्या फरकाने आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीदरम्यान (पान १ वरून) सत्ताधारी नरके गटाने विरोधी पॅनेलचे मताधिक्य तोडून आघाडी घेण्यास सुरुवात केली.
कुंभी कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले. मंगळवारी शासकीय बहुउद्देशीय हॉल रमणमळा येथे ३५ टेबलवर मतमोजणी सुरू झाली. २५ व ५० चे गट्टे करत साडेनऊच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतील उत्पादक सभासद प्रतिनिधी गट क्र. १ मधील कल विरोधी पॅनेलच्या बाजूने राहिला.
कारखाना परिसरातील निर्णायक ठरणाऱ्या सांगरुळ, वाकरे, कोगे, पाडळी खुर्द, शिरोली दुमाला या घेतली तर विरोधी पॅनेलने कुडित्रे कोपार्डे, खुपीरे, कसबा बीड या गावांत आघाडी घेतली.
पहिल्या फेरीत समाविष्ट करवीर तालुक्यातील १८ गावांतील मतमोजणी झाली. या गावांतून विरोधी पॅनेलला यापूर्वीच्या निकालात लक्षवेधी मताधिक्य असायचे. मात्र यावेळी विरोधी पॅनेलला उमेदवारनिहाय सुमारे १०० ते ५००च्या दरम्यान मताधिक्य राहिले. विरोधी पॅनेलकडून या फेरीत एक हजार ते पंधराशेपर्यंतचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज बांधला गेला होता. मात्र प्रत्यक्षात त्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या फेरीमध्ये करवीर तालुक्यातील १३ आणि पन्हाळा तालुक्यातील ५ गावांच्या ३५ केंद्रांच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. विरोधी पॅनेलला मिळालेले पहिल्या फेरीतील १०० ते ५०० चे मताधिक्य तोडून नरके पॅनेलचे बहुतांश उमेदवार दुसऱ्या फेरीत सुमारे ३०० मतांच्या फरकाने आघाडीवर राहिले.
पहिल्या फेरीत राजेंद्र सूर्यवंशींना सर्वाधिक मते….
पहिल्या फेरीअखेर विरोधी पॅनेलचे राजेंद्र सूर्यवंशी यांना ३ हजार ९०० एवढी सर्वाधिक मते मिळाली. आजवरच्या कुंभी कारखान्याच्या बाल्लेकिल्ला असलेल्या या गावांतून निवडणुकीत जुन्या सांगरुळ हे मताधिक्य या निवडणुकीतही का विधानसभा मतदारसंघातील राहील, किंबहुना यामध्ये वाढच गावांमध्ये विरोधी पॅनेलला मोठे होईल, असा अंदाज व्यक्त करीत मताधिक्य राहिले होते. काँग्रेसचा विरोधी पॅनेलकडून विजयाचे गणित मांडले जात होते. झाल्याचे पहिल्या फेरीअखेर दिसून मात्र अपेक्षेपेक्षा या मताधिक्यात घट आले.
चिट्ट्यातून कानपिचक्या….
कुंभी कारखान्याची यावेळची निवडणूक अतिशय चुरशीची व ईर्ष्णेची झाली. आता नाही तर कधी नाही असे समजून वारेमाप खर्च करण्यात आला. याला सभासदांनी, सत्ता येते आणि जाते, तुम्ही काय कायम टिकणार नाहीसा, दुसऱ्याला त्रास दिला की पुढचे दिवस वाईट येतात, अशा शेलक्या शब्दांत चिठ्ठयांच्या माध्यमातून कानपिचक्या दिल्या आहेत.
नरके पॅनेल विरुद्ध कुंभी बचाव
कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके, आ. सतेज पाटील, आ. जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके यांनी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व केले; तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचे नेतृत्व आ. पी. एन. पाटील, चंद्रदीप नरके यांचे चुलते अरुण नरके, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व चेतन नरके यांनी नेतृत्व केले.
विधानसभेची आतापासूनच चर्चा
भोगावती कारखान्याचे अध्यक्ष असलेले आ. पी. एन. पाटील विरुद्ध माजी आ. चंद्रदीप नरके यांच्यात करवीर विधानसभेसाठी सामना निश्चित आहे. त्यापूर्वी झालेल्या कारखाना निवडणुकीत बाजी कोण मारणार आणि विधानसभेसाठी काय चित्र असणार याची जोरदार चर्चा सुरू होती.
पहिल्या फेरीच्या मोजणीला लागले ७ तास
सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. गठ्ठे करून पहिल्या फेरीचे मतमोजणी करण्यास तब्बल सात तास लागले. त्यामुळे रात्री ८ वाजता मतमोजणी संपेल, हा प्रशासनाचा अंदाज फसला.
शिवाजी पेठेत जल्लोष
सत्तारूढ आघाडीचे चंद्रदीप नरके आणि विरोधी आघाडीचे अरुण नरके शिवाजी पेठेत एकाच इमारतीत राहतात. नरके वाड्यात कही खुशी, कही गम असे वातावरण होते. चंद्रदीप नरके यांच्या समर्थकांनी नरके पॅनेल आघाडी घेताच शिवाजी पेठेत जल्लोष केला. गुलालाची उधळून करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.