नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुढील १०० दिवसांचा आपला विकास कार्यक्रम निश्चित केला आहे. रेल्वे मंत्रालयातर्फे याकाळात कन्याकुमारी ते बारामुल्ला जोडणारा रेल्वेलाईन प्रकल्प येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाणार आहे.