

शिवसेनेसाठी देदीप्यमान परंपरा असलेला दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होत आहे. कोरोना नियमावलीचे पालन करून हा मेळावा होत आहे. त्यामुळे या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. त्यांनी भाषणाची सुरुवातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवून केली. मी मुख्यमंत्री आहे असे कधीच वाटता कामा नये, असे सांगत फडणवीसांना टोला लगावला.