INS Election | ‘आयएनएस‌’च्या अध्यक्षपदी करण दर्डा यांची निवड तर ‌‘पुढारी‌’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव चौथ्यांदा कार्यकारिणी सदस्यपदी!

इंडियन न्यूजपेपर सोसायटीची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
करण दर्डा (लोकमत), ‌ ‘पुढारी‌’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव
करण दर्डा (लोकमत), ‌ ‘पुढारी‌’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील वृत्तपत्रे, मासिके आणि नियतकालिकांच्या प्रकाशकांची सर्वोच्च संस्था असलेल्या ‌‘आयएनएस‌’ (इंडियन न्यूजपेपर सोसायटी) च्या अध्यक्षपदी करण दर्डा (लोकमत) यांची; तर कार्यकारिणी सदस्यपदी दैनिक ‌‘पुढारी‌’चे समूह संपादक आणि ‌‘पुढारी‌’ वृत्तसमूहाचे चेअरमन डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची निवड झाली. डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची सलग चौथ्यांदा ‌‘आयएनएस‌’च्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

इंडियन न्यूजपेपर सोसायटीची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. यात २०२६-२७ या वर्षासाठी ‌‘आयएनएस‌’च्या अध्यक्षपदी करण दर्डा (लोकमत) यांची निवड करण्यात आली. विवेक गुप्ता (सन्मार्ग) हे या सोसायटीचे मावळते अध्यक्ष आहेत. २०२६-२७ या वर्षासाठी तन्मय माहेश्वरी (अमर उजाला), हर्षा मॅथ्यू (वनिता) हे उपाध्यक्ष आणि अनंत नाथ (गृहशोभिका) हे संस्थेचे मानद खजिनदार असतील; तर मेरी पॉल या संस्थेच्या सरचिटणीस आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news