

यवतमाळ : घाटजी शहरातील मुख्य मार्गावरील व्यापारी संकुलात असलेल्या कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील कापड जळून खाक झाले. त्याची झळ बाजूलाच असलेल्या ज्योती बूट हाऊस, तनुश्री मेन्स वेअर या दुकानांना पण बसली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दुकान बंद असल्याने उशिरा हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत कापड दुकान पूर्णतः जळून खाक झाले होते. आगीमध्ये लाखोंचा कापड माल जळून खाक झाला. सकाळची घटना असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. किती रुपयाचे नुकसान झाले ते अद्याप कळू शकले नाही. यवतमाळ व घाटंजी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आगी विझविण्यासाठी प्रयत्न केले. सकाळीच आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी, पोलिसांनी, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी, वीज वितरण कर्मचाऱ्यांनी व अग्निशमन दलाने सामूहिक प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील मोठी दुर्घटना टळली.