

नागपूर : लक्ष्मीनगर येथील हेवन स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या देहव्यवसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आणि तीन तरुणींची सुटका केली तर या तरुणींकडून व्यवसाय करून घेणारी महिला दलाल सीमा अंशुल बावनगडे (३६, रा. प्लॉट नंबर ११३६, बुध्दनगर, कमाल चौक) हिला ताब्यात घेतले.
कारवाईत पोलिसांनी ३७ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. दलाल सीमा बावनगडे हिच्या ताब्यातून २ मोबाईल, ४ हजारांची रोकड, डीव्हीआर व इतर साहित्यांसह एकूण ३७ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.