

पुढारी ऑनलाईन डेस्क
नरेंद्र भोंडेकर हे भंडारामधील आमदार असून त्यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने ते नाराज होते. मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी आशा त्यांना होती. पण त्यांचे संभाव्य यादीत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर ते नाराज झाले. यानंतर त्यांनी शिवसेना पक्षामधील उपनेते होते. तसेच विद र्भाचे समन्वयक म्हणूनीही त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.
आमदार भोंडेकर हे भंडारा- पवनी मतदारसंघाचे आमदार आहेत. ते येथून तीनवेळा निवडणून आले आहेत. उपमख्युमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहले असल्याची माहिती आहे. भोंडेकर यांना मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत.