Dawood Ibrahim Mumbai house demolition stayed|डॉन दाऊदच्या घरावरील 'हातोडा' तूर्तास रोखला

२५ नोव्हेंबरपर्यंत कारवाईला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती
Dawood Ibrahim Mumbai house demolition stayed
मुंबई : बुधवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर रात्री उशिरा महानगरपालिका प्रशासनाने कुख्यात डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर असलेली मुसाफिरखाना इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. या इमारतीतील मशिदीला अभय देण्याचेही महापालिकेने ठरवले. तरीही अखेरच्या क्षणी न्यायालयाने हातोडा रोखला.Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

भेंडीबाजार येथील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारतीचे पाडकाम गुरुवारी सकाळी महापालिकेने सुरू करताच मुंबई उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश येऊन धडकले.

पुढील पाडकाम उच्च न्यायालयाने तात्पुरते थांबवले आहे. न्यायालयाने गुरुवारी सर्व संबंधित पक्षकारांना २५ नोव्हेंबरपर्यंत 'जैसे थे' स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारलाही प्रतिवादी म्हणून जोडण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला अर्ध्यावर ब्रेक लागला. आता २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालय ही स्थगिती कायम ठेवते की पाडकामाची परवानगी देते यावर दाऊदच्या या वडिलोपार्जित घराचे पाडकाम अवलंबून असेल.

पालिकेच्या सी वॉर्डने १६ नोव्हेंबरला हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना इमारतीला नोटीस बजावून रहिवाशांना घर रिकामे करण्याचे आदेश दिले होते. ही इमारत धोकादायक असल्याने सी-१ श्रेणीत मोडते, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी बुलडोझर आणि मोठ्या मशिनरीसह पालिकेच्या पथकाने मुसाफिरखान्याचा काही भाग पाडण्यास सुरुवात केली.

Dawood Ibrahim Mumbai house demolition stayed
Gold Silver Price Today: सोन्या चांदीचे दर पुन्हा कोसळले! मुंबई-पुण्यात 22 कॅरेट सोनं किती रुपयांवर? पुढे आणखी स्वस्त होणार?

हे पाडकाम सुरू असतानाच दोन रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने तातडीने सुनावणी घेत पुढील पाडकाम थांबवून 'जैसे थे' स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले.

Dawood Ibrahim Mumbai house demolition stayed
SpiceJet Flight Cancellation : मुंबई विमानतळावर स्पाइसजेटचा गोंधळ; १२ विमाने रद्द, प्रवाशांचे प्रचंड हाल

या सुनावणीत पालिकेच्या वकिलांनी सकाळी संबंधित ठिकाणी पाडकाम सुरू झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना ही इमारत हज यात्रेकरूंसाठी विश्रांतीगृह आणि मशिदीसाठी वक्फ म्हणून समर्पित करण्यात आली होती. ही इमारत भेंडीबाजारच्या पाकमोडिया स्ट्रीटवर आहे. याप्रकरणी २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.