Electric Bike Fire Beed | गिरगावात इलेक्ट्रिक स्कुटीचा अचानक भीषण स्फोट; सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, स्कुटी पूर्णपणे जळून खाक
Girgaon Electric Scooter Blast
Girgaon Electric Scooter BlastPudhari
Published on
Updated on

Girgaon Electric Scooter Blast

गिरगाव : गिरगाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात मंगळवारी ( दि.३०) सकाळी इलेक्ट्रिक स्कुटीचा अचानक स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, ही स्कुटी चार्जिंगला लावलेली नसतानाही तिच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गिरगाव येथील रहिवासी वैभव त्र्यंबक कऱ्हाळे यांनी इलेक्ट्रिक स्कुटी नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री घरासमोर उभी केली होती. मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास स्कुटीच्या बॅटरीचा अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर स्कुटीने पेट घेतला आणि आगीच्या प्रचंड ज्वाला उसळल्या.

Girgaon Electric Scooter Blast
Beed News : टाकरवन परिसरात ७२ तासांपासून अंधार

आगीची तीव्रता इतकी होती की, शेजारी उभ्या असलेल्या वाहनांनाही आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्कुटी पूर्णपणे जळून खाक झाली.

या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यावरणपूरक आणि इंधन खर्चात बचत करणारा पर्याय म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत असताना अशा घटना चिंताजनक ठरत आहेत.

Girgaon Electric Scooter Blast
Beed News | कडा येथे अखेर अप्पर तहसील कार्यालयाचा मार्ग मोकळा; शासनाची अधिसूचना प्रसिद्ध

या आगीत सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित कंपनीने द्यावी, अशी मागणी वाहनमालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news