

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑनलाईनवर लोकप्रिय असणाऱ्या आणि त्वरीत घरपोच खाद्य पुरवणाऱ्या Zomato App चा सर्व्हर शुक्रवारी सायंकाळी डाऊन झाला. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्सनी Zomatodown नावाचा ट्रेण्ड सुरू झाला आहे.
Zomato App युजर्सनी फूड ऑर्डर करण्यासाठी उघडले असता स्क्रिनवर "काही तरी चूक झाली आहे. कृपया पुन्हा प्रयत्न करा", अशा सुचना युजर्सला येत आहे. हा प्रकार रात्री ९.३५ वाजता मोठ्या प्रमाणात घडला आहे. त्यानंतर "आम्ही सध्या ऑनलाईन ऑर्डर स्वीकारत नाही. आम्ही लवकरच परत येऊ", अशी सूचना युजर्सच्या स्क्रिनवर येत आहे.
Zomato App च्या सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ट्विटरवर युजर्सनी मोठ्या प्रमाणात तक्रार केली आहे. त्याची पुष्टी Downhunter.com या अधिकृत वेबसाईटनेदेखील केलेली आहे.
अशाच पद्धतीच्या अधिकृत Servicesdown.com या वेबसाईटने सांगितले आहे की, " शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत झोमॅटो खाली जाण्याच्या कोणत्याही तक्रारी नाहीत, त्यानंतर किमान 224 तक्रारी नोंदवण्यात आल्या. रात्री 9.10 वाजेपर्यंत 20 मिनिटांत किमान 505 तक्रारी वेबसाइटवर नोंदवण्यात आल्या होत्या."
एका युजर्सने ट्विटरवर लिहिले की, "मागील ५ मिनिटांपासून मी Zomato App ऑनलाईन ऑर्डर देत होतो. पण, ऑर्डरच घेतली जात नव्हती. शेवटी मी माझ्या इंटरनेट कनेक्शनचा राग आला. त्यामुळे मी सीमदेखील बदलले; पण नंतर लक्षात आले की, माझ्या मोबाईलचा इंटरनेट व्यवस्थित आहे. शेवटी लक्षात आले की, Zomato App सर्व्हर डाऊन झाला आहे."