Nilesh Rane Resignation : निलेश राणेंच्या राजीनाम्याने सिंधुदुर्गात समर्थक राजीनाम्याच्या तयारीत!

Nilesh Rane Resignation : निलेश राणेंच्या राजीनाम्याने सिंधुदुर्गात समर्थक राजीनाम्याच्या तयारीत!
Published on
Updated on

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी मंगळवारी (दि. २४) दस-याच्या मुहुर्तावर मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही असे आपल्या ट्विटरवरून जाहीर केले. निलेश राणे यांनी घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयानंतर सिंधुदुर्गातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कट्टर समर्थक असलेले कुडाळ मधील काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपात एकच खळबळ उडाली आहे.

निलेश राणे यांनी सन 2009 ते 2014 या कालावधीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात खासदारची भूषविली होती. त्यानंतर त्यांचा सन 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या समोर सलग दोन वेळा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी गेल्या वर्षभरापासून कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केली होती. भाजप कार्यकर्ते त्यासाठी तयारीला लागले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निलेश राणे कुडाळ – मालवण मधून आमदार व्हावेत, असे देवाकडेही साकडे घातले होते. अलिकडेच भाजप नेते तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही निलेश राणे यांच्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत काहीसे संकेत दिले होते. त्यामुळे समर्थक पदाधिकारी -कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राणे यांच्या विजयासाठी कार्यकर्ते कामाला लागले होते. राणे यांनी गेल्या काही दिवसात कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात अनेकांचे भाजपात प्रवेश घडवून आणले होते. मात्र दस-याच्या मुहुर्तावर मंगळवारी दुपारी निलेश राणे यांनी सध्याच्या राजकारणात मन रमत नाही, त्यामुळे आपण सक्रिय राजकारणातून संन्यास संन्यास घेत असल्याचे आपल्या ट्विटरवरून जाहीर केले. राणे यांच्या या ट्विटनंतर कोकणातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

निलेश राणे यांच्या या घोषणेनंतर सिंधुदुर्गातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील त्यांच्या समर्थक काही पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. कुडाळ मधील राणे यांच्या दोन कट्टर समर्थक नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.काही राणे समर्थक पदाधिकारी -कार्यकर्ते सिंधुदुर्ग मधून मुंबईला जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.निलेश राणे साहेब, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत, तुम्ही जो निर्णय घेणार त्या निर्णयाशी ठाम राहणार असेही काही लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. शिवाय निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, आणि राजकारणात सक्रिय राहावे, असेही भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी मत व्यक्त केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.त्यामुळे निलेश राणे यांची पुढची रणनिती काय असेल? ते आपला निर्णय बदलतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news