Prostate problems : आयुर्वेद उपचार, आहार आणि पथ्‍य जाणून घ्‍या सविस्‍तर

Prostate problems : आयुर्वेद उपचार, आहार आणि पथ्‍य जाणून घ्‍या सविस्‍तर
Published on
Updated on

पारंपरिक उपचार : प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराने ग्रस्त झालेल्या पुरुष रुग्णांची संख्या भूमिती श्रेणीने वाढत आहे. ( Prostate problems ) प्रोस्टेट ग्रंथीच्या रुग्णांची पाच प्रकारे दखल घेता येते. 1) त्यांना शरीरात एकूण तयार होणारे मूत्राचे आणि मूत्रप्रवृत्तीनंतर तुंबून राहणार्‍या लघवीचे प्रमाण 2) मधुमेह 3) मलावरोध 4) आहारच्या वेळा आणि विविध सवयी 5) विविध व्यसने. मूत्र प्रवृत्तीनंतर तुंबून राहणार्‍या लघवीचे प्रमाण 500 सी. सी. पेक्षा जास्त असले, तर केव्हा न केव्हा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका संबंधित रुग्णाला असतो.

Prostate problems : व्यसने असणार्‍यांना कधीच विकारमुक्ती मिळत नाही

प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीबरोबर मधुमेह आणि स्थौल्य अशी जोडगोळी असल्यास रुग्णाचा रोग कष्टसाध्य आणि जास्तकाळ घेणारा असतो. रुग्णाला मलावरोधाची सवय असली, तर प्रोस्टेटची सूज कमी करणे तुलनेने अवघड होते. औषधांची संख्या तुलनेने वाढवावी लागते. तंबाखू, बिडी, सिगारेट, मशेरी, दारू अशी व्यसने असणार्‍यांना कधीच विकारमुक्तीचे लाभ मिळत नाहीत.

ही औषधे ठरतात लाभदायक

प्रोस्टेट ग्रंथींची वाढ कमी होते की नाही, हे बघण्याकरिता पुढील प्रकारे औषधी योजना तीन महिने नेटाने करावी. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळा गुग्गुळ प्र. 3 गोळ्या आणि रसायनचूर्ण 1 चमचा सकाळ- सायंकाळ घेणे. दोन्ही जेवणांनतंर अभयारिष्ट 4 चमचे आणि आम्लपित्तवटी 3 गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्याव्यात आणि रसायनचूर्ण 1 चमचा सकाळ-सायंकाळ घेणे. दोन्ही जेवणांनंतर अभयारिष्ट 4 चमचे आणि आम्लपित्तवटी, त्रिफळा चूर्ण मलावरोध तक्रारीकरिता घ्यावे.

मधुमेही व्यक्तींनी मधुमेहवटी हे जादा औषध घ्यावे. खूप स्थूल व्यक्तींनी त्रिफळागुग्गुळ आणि गोक्षुरादिगुग्गुळ आणि गोळ्या प्र. 6 दोन वेळा असे दुप्पट प्रमाण करावे. सायंकाळी लवकर आणि कमी जेवावे. भोजनानंतर कटाक्षाने किमान 1/2 तास फिरून यावे. निश्चितपणे या रोगातून मुक्ती मिळते.

ग्रंथोक्त उपचार :अभयारष्टि, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ, रसायनचूर्ण, मधुमेह असल्यास 10 बेलाच्या छोट्या पानांचा काढा नियमितपणे घ्यावा.

विशेष दक्षता आणि विहार 

कटाक्षाने सायंकाळी लवकर आणि थोडेच जेवावे. त्यानंतर न कंटाळता 20-30 मिनिटे फिरून यावे आणि मगच झोपावे.

पथ्य : आपण नेहमी जेवतो त्यापेक्षा दोन घास कमी जेवणे केव्हाही हिताचे आहे. आहार सात्त्विक असावा. ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, दुधीभोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, कोहळा, चाकवत, मेथी अशा उकडलेल्या भाज्या, पुदिना, आले, लसूण अशी चटणी, सुंठयुक्त कोमट पाणी, तसेच कटाक्षाने शाकाहार.

कुपथ्य : अकाली, उशिरा आपल्या पचनशक्तीच्या बाहेर जेवण. खूप चमचमीत, तेलगट, तूपकट, मिठाईयुक्त, मांसाहार, हॉटेलमधील जेवण कटाक्षाने टाळावे

योग आणि व्यायाम : सकाळी पुरेसा व्यायाम करावा. व्यायाम करताना रुंद पट्टीचा लंगोट अवश्य वापरावा. रात्री जेवणानंतर फिरावयास जाणे हे परम औषध आहे, असे समजावे.
मलावरोध हे जादा लक्षण असल्यास आवश्यकतेनुसार मात्रा बस्ती-पिचकारी, निरुहबस्ती-एनिमाची मदत घ्यावी.

चिकित्साकाल : किमान तीन ते सहा महिने

निसर्गोपचार : सात्त्विक राहणी, खाण्यापिण्यात संयम पाळणे, सायंकाळी कटाक्षाने सूर्यास्ताच्या आसपास आणि कमी प्रमाणात जेवणे. शाकाहार जपावा.

संकिर्ण : युरोप, अमेरिका या देशात प्रोस्टेट कॅन्सरची बाधा होणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. त्याचे कारण मासांहाराचा दुराग्रह. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली आहे, असे कळल्याबरोबर मांसाहारासकट सर्व प्रकारच्या जडान्नाचा हेवी डायटचा त्याग करावा. संयमित जीवन आणि व्यसनांपासून दूर राहून, सायंकाळी लवकर आणि कमी जेवलात तर प्रोस्टेट ग्रंथीची भीती संबंधित पुरुषाने कदापि बाळगू नये.

वैद्य विनायक खडीवाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news