Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, ६ ते १२ मे २०२४

Weekly Horoscope
Weekly Horoscope
Published on
Updated on



चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीवर अनुकूल आहे. आरोग्‍यात सुधारणा होईल. तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. तुमची मेहनत या आठवड्यात आर्थिक फळ देईल. आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात तुमच्याकडे भरपूर सकारात्मक ऊर्जा आहे. त्‍यामुळे शक्य तितकी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

वृषभ : तुम्‍ही नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. गरजूंना मदत करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. दैनंदिन दिनचर्येबरोबरच व्यायामाच्या बाबतीत वेळापत्रकावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. विश्रांतीसाठी स्वत: ला वेळ दिल्‍यास तुम्‍हाला नवी उर्जा मिळेल. अतिकामातून आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, अशी सूचना श्रीगणेश करतात.

मिथुन : या आठवड्यात राग, थकवा आणि निराशा तुमच्‍यासाठी त्रासदायक ठरेल. योग ध्यानासह संगीत किंवा तुमचा छंद जोपासल्‍यास सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असे श्रीगणेश सांगतात. इच्छापूर्तीसाठी अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. आठवड्याच्‍या अखेरीस प्रसिद्धीसह अनुकूल अनुभव येतील. कदाचित मोठा आर्थिक फायदा होणार नाही; पण जनसंपर्कातून भविष्‍यातील मार्ग सुकर होणार आहे,

कर्क : श्रीगणेश सांगतात की, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल. सहकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. आत्‍मनिरीक्षण केल्‍यास मतभेद टाळता येतील. व्यायामाचा या आठवड्यात खूप फायदा होईल. प्रेम जीवनात चढ-उतार अनुभवाल. कोणत्‍याही परिस्‍थितीत विचारपूर्वक निर्णय घ्‍या. तटस्थपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

सिंह : या आठवड्यात कठोर परिश्रम आणि दीर्घ संघर्षातून यश मिळेल. आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. तुमच्या निर्णयांचा खूप अभिमान वाटेल. तुमची कामाची प्रशंसा होईल. हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहपूर्ण आणि अनोख्या अनुभवांनी भरलेला असणार आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा अनुभवाल, असे श्रीगणेश सांगतात

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, सकारात्‍मक कामांमध्‍ये वेळ जाईल. कठोर परिश्रमातून आर्थिक लाभासाठी संधी निर्माण कराल. या आठवड्यात तुम्हाला बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. आत्मविश्वासाच्‍या जोरावर कठीण परिस्थितीवर मात कराल.आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थकल्यासारखे वाटेल.

तूळ : या आठवड्यात एक प्रकारची सकारात्‍मकता अनुभवाल. काळजीपूर्वक निर्णय घेतल्यानंतर तुमच्या वाट्याला येणारे कोणतेहीम तुम्ही परिश्रमपूर्वक कराल. इच्‍छित यश मिळविण्‍यासाठी प्रयत्‍नशील असाल. विशेष कौशल्ये आणि सहनशीलता, संयमाच्‍या जोरावर यश मिळवाल, असे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, तुमच्‍या हा आठवडा विशेष लाभदायक ठरेल. तुम्हाला तुमच्या उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे श्रीगणेश सांगतात. काही बदलासाठी तयार व्‍हाल ही जाणीव तुमच्यासाठी एक सकारात्मक बाब ठरेल. कंटाळवाण्‍या कामापासून मुक्‍तता मिळू शकते. तुमच्या आवडीच्‍या गोष्‍टींगा वेळ द्‍याल.

धनु : श्रीगणेश सांगतात की, आरोग्यातील सुधारणा ही तुमच्यासाठी या आठवड्यात सकारात्मक बाब ठरेल. पालकांकडून खूप छान भेटदेखील मिळेल. आरोग्य चांगले राहील. तुम्ही कामात व्यस्त राहाल. संयमाच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. तुमच्या कामातील समर्पणाचे कौतूक होईल.

मकर : चिंता आणि तणाव या आठवड्याचा एक भाग असू शकतात. आरोग्याची काळजी घ्‍या. व्यावसायिक प्रगतीचा विचार करण्यासाठी तुमच्यासाठी हा एक आदर्श आठवडा आहे. जोडीदाराची वागणूक तुम्‍हाला अनपेक्षित वाटू शकते. दैनंदिन दिनचर्येमध्‍ये ध्‍यानाचा समावेश करा. नकारात्‍मक विचारांपासून लांब राहा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कुंभ : या आठवड्यात तुम्ही स्वतःला आपल्‍या कार्यात सिद्ध कराल. जोडीदाराच्या भावना काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. वादात पडू नका. त्याचा नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्या आरोग्यावरही याचा नकारात्मक परिणाम होईल. शांत राहून परिस्‍थिती हाताळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, या आठवड्यात कोणत्‍याही कामात शॉर्टकट टाळा. कामांमध्‍ये विविध अडचणी आल्‍यातरी धैर्य ठेवा अन्‍यथा परिस्थिती आणखी बिघडण्‍याची शक्‍यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news