Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, २२ ते २८ एप्रिल २०२४

Weekly Horoscope
Weekly Horoscope
Published on
Updated on

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात तुम्‍हाला तुमच्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्‍यक्‍तिमत्त्‍व प्रभावित करण्‍यासाठी परिश्रम कराल. आवडीच्‍या गोष्‍टींसाठी वेळ काढाल. आर्थिक संपन्‍नता तुम्हाला संपूर्ण आठवडाभर समाधानी आणि आनंदी ठेवेल.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. पालकांकडून छान भेट मिळाल्‍याने संपूर्ण आठवडा खास आणि आनंदी वाटेल. तुम्ही कामात व्यस्त राहाल. तुमचा संयम आश्चर्यकारक असेल. संयमाच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तुमची कार्याप्रती समर्पण वृत्तीची स्‍तुती होईल. आठवड्याच्या शेवटी कठोर परिश्रमांचे फळ मिळेल.

मिथुन : तुमच्या सर्व इच्छा कठोर परिश्रमानंतरच पूर्ण होतील. राग, थकवा आणि निराशा जाणवेल. योग-ध्यानासाठी वेळ काढा. छंद जोपासत सकारात्मक राहा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कर्मचाऱ्यांकडून फसवणूक टाळण्‍यासाठी इतरांवरील अवलंबून राहू नका. या आठवड्यात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होणार नाही; पण मिळणारी प्रसिद्धी फायदेशीर ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क : भविष्याचा विचार करता या आठवड्यात तुम्हाला कोणत्या गोष्टींचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. चिंता आणि तणाव या आठवड्याचा एक भाग असू शकतो. रोज ध्यान करा. आरोग्याची काळजी घ्‍या. व्‍यवसायात प्रगतीसाठी लाभदायक आठवडा आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभल्‍याने तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. आरोग्य या आठवड्यात पूर्वीपेक्षा चांगले राहिल, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह : या आठवड्यात कठोर परिश्रमातून यश मिळवाल. आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल. तुमच्या निर्णयांचा आणि मेहनतीचा खूप अभिमान वाटेल, असे श्रीगणेश सांगतात. हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह आणि अनोख्या अनुभवांनी भरलेला असणार आहे. सकारात्मक बदल तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मदत करेल. एकंदरीत तुमच्‍यासाठी हा आठवडा खूप सकारात्मक असेल.

कन्या : तुमचा कामात चांगला वेळ जाईल. आर्थिक फायदा होईल. कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचा आत्मविश्वास कायम राहिल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थकल्यासारखे वाटेल; परंतु तुम्‍ही अधिक अनुभवसंपन्‍न व्‍हाल. या आठवड्यात फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा जेणेकरुन शेवटी सकारात्मक परिणाम मिळण्‍यास मदत होईल, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

तुला : श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात तुमचे जीवन अधिक परिपूर्ण होईल. सावधपणे निर्णय घेऊन तुमच्या वाट्याला येणारे कोणतेही काम तुम्ही परिश्रमपूर्वक कराल. सहनशीलता, संयम आणि स्थिर स्वभावाच्‍या जोरावर तुम्हाला हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्‍न करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्‍या. स्‍वत:च्‍या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नाही म्हणायला शिकावे लागेल.

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. जोडीदाराच्या भावना काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. त्यांच्याशी वाद घालू नका कारण यामुळे नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचा तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होईल. खूप दीर्घकाळ टिकणाऱ्या नातेसंबंधासाठी मार्ग तयार करा. या आठवड्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. बहुतांश निर्णय योग्‍य ठरतील.

धनु : या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीवर अनुकूल आहे, आरोग्य सुधारेल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. नवीन उपक्रम सुरु करण्‍यासाठी सकारात्‍मक वातावरण राहिल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही शक्य तितके कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण या आठवड्यात तुमच्याकडे भरपूर सकारात्मक ऊर्जा राहिल.

मकर : श्रीगणेश सांगतात की, ग्रहमान अनुकूल आहे. तुम्‍ही आत्मविश्वासाच्‍या बळावर यश मिळवाल. सहकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. वर्तनावर चिंतन केल्यास मतभेद टाळता येतील. उच्च तीव्रतेच्या व्यायामाचा या आठवड्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. कोणत्‍याही गोष्‍टींवर तत्‍काळ प्रतिक्रिया देवू नका. परिस्थितीवर विचार करुनच निर्णय घ्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, कोणत्‍याही कामात शॉर्टकट घेणे या आठवड्यात उपयुक्त ठरणार नाही. कामाच्या बाबतीत नशीब या आठवड्यात तुमच्या बाजूने नाही. दडपण घेवू नका. अन्‍यथा परिस्थिती आणखी वाईट होईल. या आठवड्यात आरोग्य चांगले राहिल.

मीन : या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. झोप, खाणे आणि शारीरिक व्यायामाच्या बाबतीत नियमित वेळापत्रक ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात एक छोटी-सुट्टी तुम्हाला चांगली करेल, तुम्ही व्यस्त राहून तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसाय सुरळीत चालेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news