Sunny Leone: सनी लिओनी म्हणते, "माझा पती खूप रोमँटिक, तो माझ्यासाठी 'अशी' गोष्ट करतो की..."

Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर, सनी लिओनीने पती डॅनियल वेबरसोबतच्या तिच्या लव्हस्टोरी बद्दल सांगितलं आहे.
Sunny Leone: सनी लिओनी म्हणते, "माझा पती खूप रोमँटिक, तो माझ्यासाठी 'अशी' गोष्ट करतो की..."
Published on

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर, सनी लिओनीने पती डॅनियल वेबरसोबतच्या तिच्या लव्हस्टोरी बद्दल सांगितलं आहे.

लग्नाला १४ वर्षे झाली तरी या जोडीमधील प्रेम आजही तसंच आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एका मुलाखतीत सनीने जुन्या आठवणी सांगितल्या.

त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना सनी म्हणाली, "ती अगदी बॉलीवूड चित्रपटासारखी होती. मी माझ्या मित्रांसोबत होते आणि मला डॅनियलसोबत डेटवर जायची अजिबात इच्छा नव्हती."

"कारण तो अशा एका व्यक्तीचा मित्र होता जो मला आवडत नव्हता. त्यामुळे मी विचार केला की, नकोच जायला."

ती पुढे म्हणाली की, न्यूयॉर्कमध्ये त्याला भेटायला तयार झाली तरी तिचे मन तयार नव्हते. "मी ठरवले होते की मी जाणीवपूर्वक पाच मिनिटे उशिरा जाईन, जेणेकरून त्याला मी आवडणार नाही."

पहिल्या भेटीत दोघेही ३ तास गप्पा मारत बसले होते. सनी म्हणते, "तेव्हा जणू आजूबाजूचं जगच गायब झालं होतं!"

एखाद्या बॉलीवूड चित्रपटाप्रमाणेच, नंतर तो मला भेटला, त्याने मला लिफ्टमध्ये ओढले, किस केला आणि मग आम्ही दोघेही हसलो."

"तो दूर असला तरी आठवणीने फुले पाठवतो. तो आजही माझ्यासाठी खूप गोड गोष्टी करतो," असं सनी कौतुकाने सांगते.

आजच्या काळातील रोमान्सबद्दल बोलताना सनी म्हणाली की, गोष्टी आता साहजिकच बदलल्या आहेत. पण डॅनियल अजूनही तितकाच रोमँटिक आहे.

"तो दूर असला तरी आठवणीने फुले पाठवतो. तो आजही माझ्यासाठी खूप गोड गोष्टी करतो," असं सनी कौतुकाने सांगते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news