History of Silver Vark : मिठाईवर चांदीचा वर्ख लावण्याची परंपरा आहे मुघलकाळापासून!

History of Silver Vark : मिठाईवर चांदीचा वर्ख लावण्याची परंपरा आहे मुघलकाळापासून!

Published on: 
Updated on: 

आज आपण चांदिचा वर्ख लावलेली मिठाई बाजारातून सहज विकत घेतो. चांदीचा वर्ख लावल्यामुळे मिठाईचे सौदर्य तर वाढतेच पण तिची किंमत व गुणही अधिक होतात

आयुर्वेदात चांदीला शीत थंडावा देणारी आणि त्रिदोषशामक मानले गेले आहे. चांदीची भस्म (रजत भस्म) किंवा अतिशय पातळ पत्र्यांचा वापर बलवर्धक रसायने, पचनाच्या गोळ्या आणि विड्यावर केला जात असे.

मुघल काळात खऱ्या अर्थाने सुरु झाला मिठाईवर वर्ख लावण्यास सुरवात झाली, १६ व्या १७ व्या शतकात मुघलांच्या दरबारात अन्न पदार्थांवर हा चांदीचा वर्ख लावला जात असे

मुळात 'वर्ख' (Waraq) हा शब्द मूळ अरबी भाषेतून आला असून त्याचा अर्थ 'पान' किंवा 'कागदासारखा पातळ पापुद्रा' असा होतो.

मुघल सम्राट, लखनौचे नवाब आणि हैदराबादचे निजाम आपल्या शाही मेजवानीमध्ये राजेशाही थाट दर्शवण्यासाठी गोड पदार्थांवर चांदी व सोन्याचे वर्ख लावून पाहुण्यांना खाऊ घालत असत.

सर्वसामान्यांपर्यंत प्रसार:मुघल साम्राज्य आणि संस्थानांमधील शाही आचारी पुढे विविध प्रांतांत गेले, तशी ही पद्धत राजवाड्यातून बाहेर पडून स्थानिक हलवायांपर्यंत पोहोचली.

लखनौ, जयपूर, दिल्ली आणि हैदराबाद ही शहरे वर्ख तयार करण्याची प्रमुख केंद्रे बनली. पुढे काजू कतली, बर्फी, पेढे यांसारख्या सणासुदीच्या मिठाईवर वर्ख लावणे हे संपन्नता, शुद्धता आणि आदरातिथ्याचे प्रतीक बनले.

चांदीमध्ये नैसर्गिकरीत्या ॲन्टिबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. वर्ख लावल्यामुळे दुधाच्या व माव्याच्या नाजूक मिठाईवर जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखला जाऊन ती काही काळ ताजी राहण्यास मदत होते.

आधुनिक फूड-ग्रेड मशिन्स आणि बटर पेपर किंवा विशेष सिंथेटिक शीट्स वापरून १००% शाकाहारी (Vegan) पद्धतीने चांदीचा वर्ख तयार केला जातो.

संबंधित बातम्या

No stories found.