

फ्रीज बंद केल्यानंतर तो फक्त दोन ते तीन तासांपर्यंतच आतील थंडपणा टिकवून ठेवू शकतो. जर तुम्ही रात्रभर किंवा ५ ते ६ तास फ्रीज बंद ठेवला, तर तुमचेच नुकसान होईल.
रात्री फ्रीज बंद ठेवल्याने आतील तापमान वाढते आणि अन्नपदार्थ खराब होऊ लागतात. तसेच ओलसरपणामुळे अन्नावर बुरशी येण्याची शक्यता असते.
वारंवार ऑन-ऑफ केल्यामुळे फ्रीजच्या कॉम्प्रेसर आणि कूलिंग सिस्टमवर अधिक ताण पडतो. यामुळे फ्रीज लवकर खराब होऊ शकतो आणि त्याचे आयुष्य कमी होते.
आजकाल सर्वच आधुनिक फ्रीजमध्ये 'ऑटोमॅटिक कट-ऑफ' हे फीचर दिलेले असते. हे फीचर गरजेनुसार फ्रीजचे कूलिंग चालू आणि बंद करते.
यामुळे विजेची बचत होते आणि फ्रीजची कार्यक्षमताही टिकून राहते. म्हणजेच, आता तुम्हाला फ्रीज बारंबार मॅन्युअली चालू-बंद करण्याचा त्रास घेण्याची गरज नाही.
फ्रीज कधी बंद करावा?
फ्रीज बंद करण्याची गरज केवळ काही विशेष प्रसंगीच असते; जसे की, जेव्हा तुम्ही फ्रीजची स्वच्छता करत असाल किंवा अनेक दिवसांसाठी गावाला जात असाल.
वीज वाचवण्यासाठी अनेक जण रोज काही तास फ्रीज बंद करतात, पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे.
याचा परिणाम केवळ फ्रीजच्या कार्यक्षमतेवरच होत नाही, तर आतील अन्नपदार्थही खराब होऊ शकतात.