Prediabetes Warning Signs |ही आहेत लक्षणे प्री-डायबेटीकची

Prediabetes Warning Signs |ही आहेत लक्षणे प्री-डायबेटीकची

Published on
Updated on

वारंवार तहान लागणे

वारंवार पाणी पिण्याची इच्छा होणे हे मधुमेहाचे एक लक्षण असू शकते. तुमच्या रक्‍तातील अतिरिक्‍त साखर तुमच्या टिशूमधून द्रव्यपदार्थ शोषूण घेते, यामुळे तुम्‍हाला वारंवार तहान लागते

वारंवार लघवीला जावे लागणे

हे ही तुम्‍ही प्री-डायबेटीक असू शकतात याचे लक्षण आहे. वाढलेली शुगर किडनीचे कार्य बिघडवते, तुम्‍हाला वारंवार लघवीला जाण्याची भावना तयार होते.

विनाकारण येणार थकवा

ब्‍लडशुगर वाढल्‍यास तुम्‍हाला विनाकारण थकवा येतो शरीर सुस्‍त राहते. वारंवार ही लक्षणे दिसल्‍यास लगेच डॉक्‍रांना दाखवलेले योग्‍य ठरेल

दृष्‍टी अंधूक होणे

शुगरमुळे दृष्‍टीवर परिणाम होते. वाढलेले साखरेचे प्रणाण डोळयांच्या बाहूल्‍यांवर परिणाम करते. त्‍यांची कार्यक्षमता कमी होऊन दृष्‍टी कमजोर होते व अंधूक दिसू लागते.

जखमा भरण्यास वेळ लागणे

रक्‍तातील साखरेच्या प्रमाणामुळे कोणतीही छोटीशी जखम भरुन येण्यास वेळ लागतो. रक्‍तशर्करेमुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होते.

त्‍वचेवर काळे डाग येणे

हे एक शुगर पेशंटचे लक्षण असू शकते, चेहरा, मानेभोवती, काखेत येणारे काळे डाग हे प्री- डायबेटीकचे लक्षण असू शकते.

वारंवार खावेसे वाटणे

सतत खावेसे वाटणे किंवा वारंवार भूक लागणे हेही साखर वाढल्‍याचे लक्षण असू शकते. इन्सूलिन रेझिस्‍टंन्समूळे पेशींमध्ये गुक्‍लोज जात नाही त्‍यामुळे वारंवार भूक लागल्‍या सारखे वाटते.

हातापायात टोचल्‍यासारखे वाटणे

हातापायत टोचल्‍याची भावना होणे, मुंग्‍या येणे, किवा पायाच्या तळव्यांमध्ये सुन्नपणा जाणवने हेही प्री डायबेटीकचे लक्षण असू शकते.

वजनात बदल

वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे हे एक मधुमेहाची लक्षण असू शकते.

चिडचिडेपणा

रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढल्‍यास नेहमी चिडचिडेपणा होतो किंवा अचानक उदासही वाटू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news