Quick cooking tips
Quick cooking tips

Quick cooking tips: स्वयंपाकाचा वेळ अर्धा करण्यासाठी प्रत्येक गृहिणीला माहित असाव्यात 'या' ट्रिक्स

Published on
Updated on

लसूण-आले पेस्ट तयार ठेवा

स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी लसूण आणि आळीची पेस्ट आधीच करून हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवावी.

कांदे आधीच उन्हात किंवा फ्राय करून ठेवा

भाजीसाठी लागणारा कांदा आधीच बारीक करून तळून किंवा डीप फ्राय करून ठेवल्यास फोडणीसाठी वेळ लागत नाही.

vegitable
vegitableCanva

भाज्या आधीच धुवून आणि चिरून ठेवा

सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळीच भाज्या निवडून, धुवून आणि चिरून एअर टाईट डब्यात फ्रिजमध्ये ठेवाव्यात.

मसाले डब्यात एकत्र करून ठेवा

वारंवार डबे उघडण्यापेक्षा रोज लागणारे मुख्य मसाले एकाच छोट्या ट्रे किंवा बॉक्समध्ये जवळ ठेवावेत.

टोमॅटोसह ग्रेव्ही बेस तयार करा

कांदा-टोमॅटोची ग्रेव्ही आधीच तयार करून फ्रिजमध्ये ठेवल्यास कोणत्याही प्रकारची भाजी १० मिनिटांत तयार होते.

प्रेशर कुकरचा योग्य वापर

डाळ, भात आणि बटाटे एकाच वेळी प्रेशर कुकरमध्ये वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवून एकाच शिट्ठीत शिजवून घ्यावेत.

फ्रोजन मटार आणि कॉर्नचा वापर

नेहमी ताजे मटार सोलण्यापेक्षा फ्रोजन मटार आणि कॉर्नचा वापर केल्याने स्वयंपाकाचा बरीच मेहनत आणि वेळ वाचतो.

एकच कढाई किंवा पॅन वापरा

वेगवेगळी भांडी धुण्याचा व वापरण्याचा वेळ वाचवण्यासाठी एकाच पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये शक्य तितके पदार्थ बनवावेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news