Indian Snake |भारतात आढळणारे प्रमुख अतिविषारी - निमविषारी साप

Indian Snake |भारतात आढळणारे प्रमुख अतिविषारी - निमविषारी साप

Published on
Updated on

सध्या पावसाळा सुरु असून सर्पदंशाचे प्रमाण वाढते : नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे चार अतिविषारी तर काही साप निमविषारी असतात यांचा माणसांना कमी धोका असतो.

भारतीय कोब्रा (Indian Cobra)

याच्या डोक्यावर ‘हुड’ (फणा) आणि त्यावर ‘U’ किंवा ‘स्नेक-लाइक’ चिन्ह. हा सर्वत्र आढळतो याचे विष न्यूरोटॉक्सिक असून मेंदू व मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते

फुरसे (Saw-scaled Viper)

हा आखूड लांबीचा, तपकिरी रंग, शरीराच्या बाजूने खवले घासल्याने "हिस्स" आवाज काढतो याचे विष हेमोटॉक्सिक असते थेट रक्तावर परिणाम करते

घोणस (Russell's Viper)

शरीर गोलसर, गडद डाग असतात. विष हेमोटॉक्सिक प्रकाराचे असते रक्त आणि ऊतींवर परिणाम करते, रक्तस्त्राव, सूज, अवयव निकामी होणे, सर्वात जास्त मृत्यूदर असलेला साप.

मण्यार (Common Krait / Bungarus)

हा काळया रंगाचा अंगावर पांढरे आडवे पट्टे असतात, याचे विष न्यूरोटॉक्सिक असून बर्‍याचदा रात्रीच्यावेळीच दंश करतो.

समुद्री साप (Sea Snake)

याचे वैषिष्‍ट्य म्‍हणजे अत्यंत शक्तिशाली न्यूरोटॉक्सिक विष असते दुर्मीळ असतात मासेमारीदरम्यान संपर्कात येतात

किंग कोब्रा (king cobra)

याच्या महाकाय आकारामुहे नागांचा राजा म्‍हणून ओळख, विषाचे प्रमाण अधिक असते पश्चिम घाट, केरळ,गोवा इत्‍यादी क्षेत्रातील घटदाट जंगलात आढळतो. स्‍वजातभक्षक असतो (इतर साप खातो)

कॅट स्नेक (Cat Snake) (निमविषारी)

याचे डोळे मांजरीसारखे व लांबट शरीर असते याचे विष सौम्य असते फारसा धोका नसतो.

ग्रीन वाईन स्नेक (Green Vine Snake) (निमविषारी)

हा पातळ व लांबट शरीर; हिरवट रंगाचा असतो याचे विष सौम्‍य असून चावलेल्‍या ठिकाणी सूज व जळजळ करते.

सँड बोआ (Sand Boa)

हा जाड, लहान शेपटी असलेला तपकिरी किंवा राखाडी रंगाचा असतो. बऱ्याचदा घोणससारखा वाटतो याचे विष सौम्‍य असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news