आले दीर्घकाळ ताजे आणि रसरशीत ठेवण्यासाठी ४ सोपे घरगुती उपाय

How to store Ginger: आले फ्रीजमध्ये ठेवले तर दमटपणामुळे ते सडते आणि बाहेर ठेवले तर सुकून लाकडासारखे कडक होते. आले रसरशीत ठेवायचे असेल, तर पुढील ४ पद्धतींचा वापर करता येऊ शकतो.
आले दीर्घकाळ ताजे आणि रसरशीत ठेवण्यासाठी ४ सोपे घरगुती उपाय
Published on
Updated on

चहाची चव वाढवण्यापासून ते भाजीला खमंग फोडणी देण्यापर्यंत प्रत्येक स्वयंपाकघरात आल्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

मात्र, आले फ्रीजमध्ये ठेवले तर दमटपणामुळे ते सडते आणि बाहेर ठेवले तर सुकून लाकडासारखे कडक होते.

आले रसरशीत ठेवायचे असेल, तर पुढील ४ पद्धतींचा वापर करता येऊ शकतो.

ट्रिक १: टिश्यू पेपरचा वापर

आल्यातील जास्त ओलाव्यामुळे त्याला बुरशी लागते. हे रोखण्यासाठी आले पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळा.

मग ते एका हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. टिश्यू पेपर अतिरिक्त ओलावा शोषून घेईल.

ट्रिक २: झिपलॉक बॅगचा वापर

बाजारातून आणलेले आले आधी स्वच्छ धुवून पूर्णपणे सुकवून घ्या. त्यानंतर ते एका झिपलॉक बॅगमध्ये भरा.

बॅग बंद करताना त्यातील सर्व हवा बाहेर काढा. यामुळे आल्यामधील आवश्यक रसरशीतपणा टिकून राहतो.

ट्रिक ३: आले फ्रीझरमध्ये करा स्टोअर

आल्याची साल काढून त्याचे लहान गोल तुकडे करा.

हे तुकडे हवाबंद डब्यात ठेवून थेट फ्रीझरमध्ये ठेवा. आयत्या वेळी चहा किंवा भाजीसाठी हे तुकडे काढून थेट किसून किंवा वाटून वापरता येतात.

ट्रिक ४: फ्रीजमध्ये आले नेमके कुठे ठेवावे?

आले नेहमी फ्रीजच्या दरवाजातील कप्प्यांमध्ये ठेवावे, तिथे तापमान संतुलित असते.

किंवा फ्रीजच्या भाजीच्या कप्प्यातील 'क्रिस्पर सेक्शन'मध्ये ठेवावे. यामुळे आले सडतही नाही आणि लाकडासारखे सुकतही नाही.

logo
Pudhari News
pudhari.news