Fat Burn Foods : हे आहेत चरबी जाळणारे पदार्थ!

Fat Burn Foods : हे आहेत चरबी जाळणारे पदार्थ!

Published on: 
Updated on: 

शरीरातील चरबी (फॅट) वेगाने बर्न करण्यासाठी आणि चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) गतिमान करण्यासाठी उपयुक्त ठरणारे काही पदार्थ आहेत. वजन कमी करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त ठरतात

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये 'कॅटेचिन्स' नावाचे अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफिन असते, जे शरीराचा मेटाबॉलिझम दर वाढवून फॅट बर्न करण्यास थेट मदत करतात

अंडी : उच्च दर्जाचे प्रथिने असल्याने अंडी खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शरीराला प्रथिने पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज आणि चरबी जळण्यास मदत होते

मिरची व तिखट पदार्थ : लाल किंवा हिरव्या मिरचीत Capsaicin हे घटक असते. हे घटक शरीराचे अंतर्गत तापमान थोडे वाढवते, ज्यामुळे जास्त कॅलरी जळतात आणि भूक नियंत्रित राहते

आले आणि लसूण: आल्यामधील 'जिंजरॉल' पचनक्रिया सुधारून कॅलरी बर्निंग वाढवते. लसणातील घटकांमुळे रक्तातील चरबीचे प्रमाण संतुलित राहण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत होते

सफरचंद सायडर व्हिनेगर : यातील ॲसिटिक ॲसिड रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण स्थिर ठेवते, भूक कमी करते आणि शरीराला साठवलेली चरबी ऊर्जेच्या रूपात वापरण्यास प्रवृत्त करते

ओट्स आणि कडधान्ये : यामध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर पचनसंस्थेतील चरबीचे शोषण कमी करते आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुणकारी ठरते.

दही किंवा ताक : दह्यातील प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम पचनक्रिया सुरळीत ठेवतात. कॅल्शियम शरीरातील फॅट सेल्सचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

चिया सीड्स आणि अक्रोड: यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर असतात. हे 'चांगले फॅट्स' शरीरातील सूज कमी करतात आणि लेप्टिन हार्मोन्सचे प्रमाण सुधारून फॅट बर्निंग वाढवतात

आणि सर्वात महत्‍वाचे म्हणजे पुरेसे पाणी पिणे हा फॅट बर्न करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. थंड किंवा कोमट पाणी पिल्याने चयापचय काही काळासाठी ३०% पर्यंत वाढतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news